उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चुकूनही करू नका 'या' भाज्यांचे सेवन
शरीरात वाढलेली उष्णता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचा तणाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरात उष्णता वाढल्यानंतर पचनसंस्था बिघडणे, त्वचा आणि आरोग्यावर अनेक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला पचन होणाऱ्या हलक्या आणि कमी तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या किंवा फळांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात आणि कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पोषण आहाराची आवश्यकता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पोषण देणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. गवार, कारली, पडवळ, दोडका, आणि भेंडी इत्यादी भाज्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतात. याशिवाय शरीरातील उष्णता कमी होते. या भाज्यांमध्ये आढळून येणारे फायबर पचनक्रिया निरोगी ठेवतात.
उन्हाळ्यात तेलकट किंवा अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बटाटा, वांग किंवा मटारचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये असलेले घटक शरीरात उष्णता वाढवतात.
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी ठरते. नियमित पालेभाज्या खाल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. पालेभाज्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात.
उन्हाळ्यात काकडी, भोपळा, दुधी भोपळा इत्यादी भाज्यांचे आहारात सेवन करावे. कारण या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. याशिवाय काकडी खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होतात. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात काकडी आणि इतर पाणी युक्त भाज्यांचे सेवन करावे. या भाज्या शरीराला पोषण देतात.
बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहात? मग दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ
शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता दूर करण्यासाठी दैनंदिन आहारात बीट, पालक इत्यादी अनेक भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल आणि आरोग्य सुधारेल. उन्हाळ्यात त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीट, गाजर, पालक इत्यादी भाज्या खाव्यात.