वातावरणातील बदलांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचे सेवन
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रात्रीच्या वेळी तर दिवसभरात वाढलेल्या उन्हामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वातावरणात बदल झाल्यानंतर काहीवेळा सर्दी, खोकला इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मसाल्यांचे सेवन करावे. आपले शरीर तंदुरुस्त व रोगमुक्त ठेवण्यासाठी त्या पदार्थांचे आपल्याला मदत होत असते. परंतु केवळ माहितीअभावी आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला अनेक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यातीलच एक म्हणजे किचनमध्ये सहज उपलब्ध होणारे विविध प्रकारचे मसाले घटक. हे पदार्थ अँटीबॅकटेरियल गुणधर्मापासून ते अँटी ऑक्सिडंट, कर्करोगविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण समजले जात असतात. हे सर्व प्रामुख्याने मसाले, औषधी वनस्पती या सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन आहारात समतोल आणि माफक प्रमाणात वापर केला, तर सर्व 60 टक्के आरोग्य समस्या यातूनच दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत.
तुळस हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऍक्सिडेंट घटक रक्त स्वच्छ करण्याचे काम करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात.याशिवाय तुळशीचा वापर धार्मिक गोष्टींसुद्धा केला जातो. त्यामुळे आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास तुळशीच्या पानांचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी किंवा नाश्त्यात दालचिनीच्या चहाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. दालचिनीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी आवश्यक आहेत. धमन्या आणि नरांमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी कार्य दालचिनीच्या माध्यमातून होत असते. तसेच यातून रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.
वातावरणातील विषारी, सुक्ष्मजंतु, जीवाणू आणि बॅक्टेरियापासून शरीराचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त लवंगमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म देखील असतात. लवंगमध्ये असलेले गुणधर्म शरीराचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लवंगचे सेवन करावे किंवा तुम्ही लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता.
धण्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराची खराब झालेली पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स राहते. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धण्याचे पाणी प्यावे.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात जिऱ्याची पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास पचनसंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि आरोग्याला फायदे होतात. जिऱ्याचे पाणी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे काम करते. यात कॅन्सरविरोधी घटक भरपूर प्रमाणात असतात. दैनंदिन आहारात नियमित जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे.