दह्यासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये जमा होईल विष
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दह्याचे सेवन केले जाते. दह्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात दह्याचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीरात थंडावा निर्माण होतो. दह्याचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत राहतात, पचनक्रिया सुधारते, शरीराची ऊर्जा वाढते इत्यादी अनेक फायदे होतात. दह्यापासून कढी, ताक इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने दह्याचे सेवन केल्यास गॅस, पोटदुखी, सूज इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही पदार्थासोबत दह्याचे सेवन करू नये.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
कोणत्याही पदार्थासोबत दही खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात दह्याचे सेवन करताना योग्य पद्धतीने करावे. फळे, मच्छी, बटाटे इत्यादी पदार्थ दह्यासोबत एकत्र खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
आरोग्यासाठी दही आणि फळे अतिशय फायदेशीर आहेत. मात्र चुकीच्या पद्धतीने या दोन्ही पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. फळांचे सलाड, स्मूदी बनवताना दह्याचा वापर केला जातो. पण त्यामध्ये आंबट फळांचा वापर केल्यास पचनक्रिया बिघडून पोट दुखीची समस्या उद्भवू शकते. आंबट फळांमध्ये आढळून येणारे ऍसिड आणि दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड एकत्र येऊन पचनक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे दह्यासोबत आंबट फळांचे सेवन करू नये.
मच्छी आणि दही हे पदार्थ एकत्र खाल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मच्छीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, तर दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यामुळे पचनक्रियेवर गंभीर पारिणाम होण्याची शक्यता असते. मच्छी आणि दही हे दोन पदार्थ एकत्र शरीरात गेल्यामुळे आतड्यांमध्ये विष तयार होऊ लागते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अनेकदा घरी कोशिंबीर बनवताना त्यात कांदा, दही, टोमॅटो इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. मात्र हे दोन पदार्थ एकत्र खाल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. पोटात गॅस आणि ऍसिडिटी वाढत,पोट फुगते, अपचन होते, पोटात अस्वस्थता जाणवते, छातीत जळजळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.






