कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, आहारात पोषक घटकांचा अभाव, वातावरणात होणारे बदल इत्यादी अनेक कारणांमुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीराच्या वाढीसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. पण शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. हाडांच्या निर्मितीसाठी आणि मजबूत हाडांसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. हाडांमध्ये वेदना, दातांमध्ये झिणझिण्या येणं, नखं तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. हाडं आणि दातांच्या निरोगी वाढीसाठी शरीरात ९९ टक्के कॅल्शियम असणे आवश्यक आहे. कॅल्शियम मेंदू आणि शरीरातील इतर अवयवनांच्या कार्यवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. शरीरात निर्माण झालेल्या कॅल्शियमच्या कमतरतेला ‘हायपोकॅल्सीमिया’ असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला कॅल्शियमची कमतरता उद्भवल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने हाडांचे दुखणे, स्नायू दुखणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. तुमच्या शरीरातील हाडे आणि स्नायू वारंवार दुखत असतील तर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्याचे प्रमुख लक्षण आहे.
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर नखांच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. नखांच्या वाढीवर परिणाम झाल्यानंतर नखं सतत तुटणे, नखांमध्ये पांढरे डाग दिसणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेल्या कॅल्शियमच्या कमतरतेचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. हृदयाचे ठोके अनियमित होऊन जातात. ज्यामुळे हृदयाचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. हातांमध्ये सतत मुंग्या आल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. अन्यथा इतर गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, दूध, दही, अंडी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. संत्री, अंजीर आणि केळ्यांचे सेवन केल्यास शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. निरोगी आरोग्य राहण्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे.