लहान मुलांना नेहमी नेहमी इतरांची नजर लागते. त्यामुळे मुले प्रचंड चिडचिड करतात तसेच जेवन करत नाही . लहान मुलांचा हा चिडचिडेपणा पाहून त्यांची नजर उतरण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिष शास्त्रात लहान मुलांला लागलेली नजर दूर करण्याचा एक मार्ग देखील सांगितला आहे. ज्यामुळे मुलाला लागलेली नजर निघून जाते.
नजर उतरण्याची परंपरा ही फक्त आपल्या भारतात नाही तर जगात अनेक ठिकाणी वर्षोनुवर्षो पासुन ही परंपरा चालु आहे. एखाद्या व्यक्तीच्या प्रमोशनपासून तर नविन घर खरेदी केलं किंवा दुकानात चांगली भरभराट होत असले तर अशा अनेक गोष्टींवर लोकांची वाईट नजर लागु शकते. लहान मुलांना तर दररोज कुणाची ना कुणाची नजर लागते, त्यामुळे मग ते सारखे सारठे आजारी पडतात, खाणेपिणे बंद करून नुसती चिडचिड करतात.
नजर लागते आणि ती उतरावी लागते या गोष्टीवर अनेक जण विश्वास करत नाही. पण जेव्हा लहान मूल विनाकारण खाणे-पिणे बंद करते आणि चिडचिड करते, तेव्हा त्याची नजर उतरवणे गरजेचे असते. त्यामुळे घरातील आजी सारख सारख सांगण राहते की नेहमी मुलाची नजर उतरायची. चला तर आज आपण ज्योतिष शास्त्रामध्ये नजर उतरण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्या उपायाविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
अख्ख्या लाल मिरच्या हातात घेऊन लहान मुलाला लागलेली नजर काढणे ही फार जुनी परंपरा आहे. लहान मुलावरून लाल मिरच्या तीनदा उतरून टाकून त्या मिरच्या जाळून टाकाव्या. असे केल्याने आपोआप बाळाला लागली नजर हळूहळू उतरू लागते.
तुमचे लहान बाळ दूध पीत नसेल, सारखे रडत असेल आणि चिडचिड करत असेल, तर शनिवारी आईचे कच्चे दूध ७ वेळा काढून कुत्र्याला पाजावे. यामुळे बाळ दूध पिण्यास सुरुवात करेल.