फोटो सौजन्य: Pinterest
अनेकांच्या घरात पाळीव कुत्रा असतो. खरंतर पाळलेला असला तरी तो घरच्या सदस्यांइतकाच महत्त्वाचा असतो. पाळीव प्राण्यांना घरातील कुटुंबाकडून प्रेम मिळत असलं तरी त्यांची तितकी काळजी देखील घेणं गरजेचं आहे. पाळीव प्राण्यांचा अंगांचा विशिष्ट असा घाणेरडा वास येत असतो. त्यामुळे आपल्याला या प्राण्यांच्या अंगाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ते जाणून घेऊयात.
पाळलेला असो रस्त्यावरचे कुत्र्यांच्या शरीरातील काही हार्मोन्समुळे किंवा सतत अस्वच्छ ठिकाणी राहत असल्याने त्यांना अनेकदा त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे त्यांच्या अंगाला घाण वास येतो. कुत्र्यांमध्ये दुर्गंधी येणे हे सहसा घाण, ओलावा किंवा त्वचेच्या समस्यांमुळे होते. यामुळे अनेकदा या प्राण्यांच्या दुर्गंधीमुळे कुटुंबातील सदस्यांना देखील त्रास होतो. यावर घरगुती उपाय काय करता येतील याबाबत .अॅनिमलमेडसेंटरच्या तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय
अॅनिमलमेडसेंटरच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राण्यांना शक्य तितकं स्वच्छ ठेवावं. त्यांना अस्वच्छ ठेवल्यास सगळ्यात जास्त त्रास हा कुटुंबातील व्यक्तींनाच मोठ्य़ा प्रमाणात होतो. पाळीव कुत्र्यांना नियमितपणे आंघोळ घालणे खूप महत्वाचे आहे. बाजारात पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक गरजेच्या वस्तू उपलब्ध आहेत. कुत्र्यांच्या स्वच्छतेसाठी शाम्पू वापरा.जर कुत्र्याची त्वचा संवेदनशील असेल तर ओटमीलयुक्त शाम्पू वापरा. कुत्र्यांच्य़ा केसांत ओलावा राहिल्याने दुर्गंध जास्त येतो. त्यामुळे कुत्र्यांना अंघोळ घातल्यानंतर लगेच कोरडं करा.
अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर
कुत्र्यांच्या त्वचेचा दुर्गंध कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर देखील तुम्ही वापरु शकता. एक कप पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. कुत्र्याच्या केसांवर हलके स्प्रे करा आणि ते कोरडे होऊ द्या. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
कुत्र्यांच्या संबंधित
काही कुटुंब कुत्र्यांची विशेष काळजी घेतात. जसं की कुत्र्यांना झोपायला वेगळा बेड वगैरे असणं. जर तुमच्याही कुत्र्यांना झोपायला वेगळा बेड असेल तर आठवड्यातून एकदा तरी त्याला स्वच्छ करा. बॅक्टेरिया आणि ओलावा दूर करण्यासाठी बेड उन्हात वाळवा.
संतुलित आहार द्या
त्वचेच्या आणि केसांच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी कुत्र्यांच्या आहारावर विशेष लक्ष द्या. त्यांना उच्च दर्जाचे अन्न द्या आणि आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले अन्न समाविष्ट करा. यामुळे केस आणि त्वचा निरोगी राहते.
ब्रशिंग आवश्यक आहे-
आठवड्यातून 2 ते 5 वेळा कुत्र्याच्या केसांवर ब्रश फिरवणे आवश्यक आहे. असे केल्याने, नैसर्गिक तेल योग्यरित्या वितरित होते आणि मृत फर काढून टाकली जाते.
कडुलिंबाचे तेल किंवा कोरफडीचा गर
कडुलिंबाचे तेल हे जंतूनाशक आहे. कडुलिंबाचे तेल किंवा कोरफडीचा गर त्वचेच्या समस्या दूर करतं. कडुलिंबाच्या तेल ते कुत्र्याच्या केसांवर लावा. तुम्ही कोरफडीचे जेल देखील वापरू शकता, ज्यामुळे त्वचेचा दाह कमी होतो. कान, दात आणि नखे यांच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष द्या, कारण या ठिकाणांमुळे देखील वास येऊ शकतो.कुत्र्याला नियमितपणे ब्रश करा, जेणेकरून केसांमधील घाण, केस आणि मृत त्वचा निघून जाईल.जर एवढ करुनही बराच काळ वास टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.