सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवून खावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. कारण जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यास पचनक्रिया बिघडू शकते आणि आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात स्मूदी किंवा मिल्कशेक बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खजूर मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खजूर खाणे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. मिल्कशेक प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अनेक लोक वजन वाढेल म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात, पण असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खजूर स्मूदीचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया खजूर मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणात दोन घास जातील जास्त! कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव