तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित 'या' आजारांपासून मिळेल कायमची सुटका
भारतात पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच लोक तांब्याच लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे म्हणजे आयुर्वेदिक थेरपी मानली जाते. या पाण्याचे सेवन नियमित सकाळी उठल्यानंतर केल्यास महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. हे पाणी अमृताप्रमाणे शरीरावर परिणाम करते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल, अँटीइंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाईंड गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? तांब्याच्या बॉटलमधील पाणी प्यावे की नाही? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यावर सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात, तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील पित्त, कफचं संतुलन नियंत्रणात राहते. याशिवाय आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या खनिजाचा समावेश केला जातो. त्यातील अतिशय गुणकारी खनिज म्हणजे तांबे. यामध्ये एंटीमायक्रोबियल, एंटी इंफ्लेमेटरी, एंटी कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्म आढळून येतात. शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी अनेक नवीन पेशी तयार होण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी उपाशी पोटी प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. शरीराची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी तांब अतिशय प्रभावी ठरते. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. शरीराचे मेटाबॉलिझ्म सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्याचे पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यात असलेले घटक कोलोजन त्यर्व करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी सर्वप्रथम, बॉटलमध्ये भरून ८ तास तसेच ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. तांब्याच्या भांड्यातील पाणी ताम्र जल किंवा कॉपर चाज्र्ड वॉटर असे सुद्धा म्हंटले जाते.
तांब्याचे पाणी पिण्याचे फायदे:
तांब्याचे पाणी पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. तांब्यामध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म हानिकारक जीवाणूंना निष्क्रिय करून पाणी निर्जंतुक करतात.
तांब्याचे पाणी कसे प्यावे:
तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर किंवा किमान 8 तास ठेवा.हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वोत्तम मानले जाते.
तांब्याचे पाणी पिताना घ्यायची काळजी:
जास्त प्रमाणात तांब्याचे सेवन विषारी असू शकते आणि त्यामुळे यकृत व मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते.जर तुम्हाला आधीपासून मूत्रपिंड किंवा यकृताचा आजार असेल, तर तांब्याच्या बाटल्या वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.