COPD चे संकेत आधी कळणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)
सीओपीडी समजून घेताना कोल्हापूर येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. पृथ्वीराज राजेंद्र मेठे सांगतात की, सीओपीडीला सामान्यतः एम्फिसीमा किंवा क्रॉनिक ब्राँकायटिस असे म्हणतात. एम्फिसीमामध्ये फुफ्फुसातील वायुमार्गाच्या शेवटी असलेल्या लहान वायुकोशांचे नुकसान होते तर क्रॉनिक ब्राँकायटिसमध्ये श्वसनमार्गामध्ये जळजळ झाल्यामुळे श्लेष्मा येऊन सतत खोकला येतो. घरातील प्रदूषण (जसे की स्वयंपाकाच्या चुलीचा धूर), बाहेरील प्रदूषण आणि विशेषतः शेतीमधल्या हानिकारक पदार्थांचा व्यावसायिक संपर्क यांसारख्या कारणांमुळे सीओपीडी होऊ शकतो. तथापि, धूम्रपान हा सर्वात महत्त्वाचा जोखीम घटक आहे. श्वास घेण्यास त्रास होणे आणि कफसह दीर्घकालीन खोकला ही सामान्य लक्षणे आहेत.
World COPD Day: फुफ्फुसाचा हा गंभीर आजार कान, घसा, नाक करेल निकामी, काय आहेत लक्षणं
लवकर निदान होण्याची महत्त्वाची भूमिका
सीओपीडीचा प्रसार हळूहळू होत असल्याने, लक्षणे हळूहळू दिसतात आणि कालांतराने आरोग्य बिघडते ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूण जीवनमान कमी होते. यामुळे चालणे किंवा जेवण तयार करणे यासारखी मूलभूत रोजची कामे करण्याची क्षमता मर्यादित होते. गंभीर प्रकरणांमध्ये, लक्षणे पटकन वाढल्याने अथवा बिघडल्याने सीओपीडीचा त्रास वाढू शकतो किंवा फुफ्फुसांचा झटका येऊ शकतो, ज्यातून बरे होण्यासाठी एक महिनाभराचा कालावधी लागू शकतो.
जर सीओपीडीची तपासणी झाली नाही तर, तो फुफ्फुसांचा कर्करोग आणि न्यूमोनियासारख्या संसर्गांसह जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे, सीओपीडीमुळे उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयरोग देखील होऊ शकतात.
सीओपीडीचे निदान
जरी सीओपीडीचा धूम्रपानाशी जवळचा संबंध असला तरी, सीओपीडी हा केवळ “धूम्रपान करणाऱ्यांचा आजार” नाही. जोखीम घटकांमध्ये लहानपणी वारंवार झालेले श्वसन संक्रमण, घरातील प्रदूषकांचा संपर्क, वायू प्रदूषण, सेकंड हॅन्ड स्मोक आणि कामाच्या ठिकाणी असणारे प्रदूषक यांचा समावेश असतो. लक्षणे तपासत, वैद्यकीय इतिहासाचे मूल्यांकन करत आणि शारीरिक तपासणी करत याचे निदान करता येऊ शकते .
प्रमुख निदान साधन म्हणजे स्पायरोमेट्री आहे – एक अशी चाचणी जी व्यक्ती किती श्वासावाटे किती हवा घेऊ शकते आणि सोडू शकते हे मोजते, या चाचणीमुळे फुफ्फुसांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होते. तथापि, अनेक निदान केवळ रुग्णांच्या इतिहासावर अवलंबून असतात, ज्यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णांची संख्या कमी होते. स्पायरोमेट्री चाचणीचे मानकीकरण वेळेवर आणि अचूक निदान सुनिश्चित करू शकते.
फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
सीओपीडीचे व्यवस्थापन आणि जीवनमान
जरी सीओपीडी संबंधित आजाराने फुफ्फुसांचे झालेले नुकसान भरून काढता येत नाही, परंतु जीवनशैलीतील बदल आणि योग्य उपचारांनी लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात आणि रोगाची फैलाव कमी करता येऊ शकतो. श्वासावाटे घेण्यात येणारी औषधे, विशेषतः ब्रोन्कोडायलेटर इनहेलर्स, श्वसनमार्गांना आराम देण्यास आणि श्वास घेण्यास सुलभ करण्यास मदत करतात. नेब्युलाइज्ड उपचार आणि फुफ्फुसीय पुनर्वसन कार्यक्रमामुळे ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण सुधारते, धाप लागण्याचे प्रमाण कमी होते आणि जीवनाची गुणवत्ता वाढवते.
जागरूकता वाढवणे
लवकर निदान करणे आणि स्वतःची काळजी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, रुग्णांना चालना आणि चेतावणीची चिन्हे ओळखता यायला हवीत. लवकर निदान आणि उपचारांच्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता उपक्रम आणि रुग्ण समर्थन कार्यक्रम करणेआवश्यक आहेत. संपूर्ण भारतात सीओपीडीचे परिणाम सुधारण्यासाठी, जागरूकता आणि वेळेवर कारवाईची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.






