ऑक्टोबर हिटमध्ये पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ खावेत:
राज्यभरात सगळीकडे ऑक्टोबर हीट सुरु असल्यामुळे उन्हाळ्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबर हीटमध्ये ऊन वाढल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. बाहेर जाताना तोंडाला स्कॅर्फ बांधणे, भरपूर प्रमाणात पाणी इत्यादी गोष्टी केल्यास आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही. उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. राज्यभरात काही ठिकाणी ऊन तर काही भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू आल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्नपदार्थ पचनास जड जातात. त्यामुळे पचनास हलके आणि पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करावे.शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पचनक्रियेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहील. पित्ताचा त्रास जाणवू लागल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑक्टोबर हीटपासून वाचण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कमी वयात डोळ्यांना चष्मा लागला आहे? मग डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शरीर शांत राहते. ताक प्यायल्यामुळे पोटातील जळजळ कमी होऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात ताक किंवा दह्याचे सेवन करावे. ताकामध्ये आढळून येणारे गुणधर्म शरीराला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
नारळ पाणी हे नैसर्गिक पेय आहे. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच सकाळी उठल्यानंतर नारळ पाणी प्यायल्यास त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो.नारळ पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स आढळून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळ पाणी मदत करते.
विटामिन सी आणि ए युक्त केळी नियमित खावीत. केळी थंड असल्यामुळे पोटात होणारी जळजळ थांबते. रोजच्या आहारात कमीत कमी २ केळ्यांचा समावेश करावा. केळी खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केळी खायला आवडतात.
हे देखील वाचा: पान आणि लवंगमुळे करा तणाव दूर, वाचा हा सोपा उपाय
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आढळून येते. डाळिंब फळांसोबतच डाळिंबाच्या बिया, देठ साल, पानं इत्यादी सर्वच गोष्टी औषधी आहेत. आयुर्वेदामध्ये डाळिंबाच्या सालीला विशेष महत्व आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि इतर ऋतूंमध्ये डाळिंब उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस पिऊ शकता.
बाजारात सुके आणि ओले असे दोन्ही प्रकारचे अंजीर उपलब्ध असतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात नियमित अंजीरचे सेवन करावे. अंजीर खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेला अशक्तपणा कमी होईल.