आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण पदार्थ आहेत. जसजसे ठिकाण बदलते तसतसे खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांमध्ये बदल होत जातात. जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्याकडे अनेक पदार्थांची मेजवानी बनवली जाते. यात अनेकदा तोंडी लावणाऱ्या चटपटीत आणि झणझणीत पदार्थांचा समावेश असतो. पदार्थ जसे की, चटणी, कोशिंबीर, लोणचं , पापड, कुरडई असे पदार्थ तोंडी लावले जातात. आपल्याकडे चटण्यांचे आणि पापडाचे अनेक प्रकार आहेत.
आता तुम्ही आजवर अनेक प्रकारचे पापड आणि चटण्या खाल्ल्या असतील पण तुम्ही कधी पापडाचे कुरकुरीत चटणी खाल्ली आहे का? देशातील अनेक भागात ही चटणी बनवून खाल्ली जाते. तुम्ही आजवर हीच आस्वाद घेतला नसेल तर आजचा रेसिपी वाचा आणि बनवून पहा. या चटणीचा एक व्हिडिओ @maharashtrian_recipes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पापडाच्या चटणीची हटके आणि चविष्ट रेसिपी जाणून घेणार आहोत.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी
View this post on Instagram
A post shared by Maharashtrian Recipes – Latika Nimbalkar (@maharashtrian_recipes)
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: अवघ्या 10 मिनिटांत बनवा झटपट बिस्किटांचे मोदक, नोट करा रेसिपी