मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार
नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल- फडणवीस
निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे मिळतेय गती
नागपूर: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका वठवावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपूर -अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे.
Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर
ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची महत्वाची भूमिका ठरते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राची आर्थिक प्रगती राज्यासमोर मांडली.
एडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्कच्या शुभारंभ' कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी 'XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्क'चे… pic.twitter.com/yB3UoyHDNp — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2026
आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नरत आहे. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्त्वाची भूमिका आहे.नागपूर उद्योगाचे मॅग्नेट बनवताना एक्सएसआयओ जोरकसपणे कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. एक्सएसआयओ ने नेक्स्ट जेन बाबतही देशात अन्य ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारताना नागपुरलाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनवताना या पार्कने महत्वाची भूमिका वठवावी असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे.






