ज्येष्ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन
कल्याण, ऑक्टोबर 2024 : फोर्टिस हॉस्पिटल कल्याणने कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि समन्वय सीनियर सिटीझन्स असोसिएशनसोबत सहयोगाने 4 ऑक्टोबर रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन केले. फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील डॉक्टरांनी सविस्तरपणे चर्चा करत सामान्य न्यूरोलॉजिकल, कार्डियोव्हॅस्कुलर व ऑर्थोपेडिक आजारांबाबत माहिती देण्यासोबत जनजागृती केली. या सत्रामध्ये उपस्थित व्यक्ती आरोग्यसेवा व्यावसायिकांना भेटल्या, त्यांना शंका विचारल्या, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपलब्ध उपचारांबाबत माहिती मिळवली.
फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथील डॉ. झाकिया खान (सीनियर कन्सल्टण्ट- इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजी), डॉ. स्वप्नील केणी (कन्सल्टण्ट- ऑर्थोपेडिक्स), डॉ. जयेश सरधारा (सीनियर कन्सल्टण्ट- न्यूरो अँड स्पाइन सर्जरी) आणि डॉ. ऋषभ छेडा (असोसिएट कन्सल्टण्ट – न्यूरो सर्जरी) यांनी या सत्राचे नेतृत्व केले. तसेच, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आयुक्त माननीय डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हे देखील वाचा: मसाल्याचे पाणी शरीराला करते डिटॉक्स, जाणून घ्या जबरदस्त फायदे
ज्येष्ठ नागरिकांसाठी जागरूकता सत्राचे आयोजन
या सत्राबाबत मत व्यक्त करत डॉ. इंदुराणी जाखड म्हणाल्या, ”आम्ही ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे न्यूरोलॉजिकल, कार्डियोव्हॅस्कुलर व ऑर्थोपेडिक आरोग्याच्या महत्त्वपूर्ण पैलूंबाबत जागरूक करण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाकरिता फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे मनापासून आभार व्यक्त करतो. या सत्राच्या माध्यमातून उपस्थितांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जीवनशैली बदल आणि जोखीमयुक्त लक्षणांचे लवकर निदान याबाबत माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांना स्वत:चे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होईल आणि भविष्यात गंभीर गुंतागूंतींचा धोका कमी होईल.”
हे देखील वाचा: थायरॉईडसाठी अमृतासमान आहे या बियांचं पाणी
या सत्राबाबत मत व्यक्त करत डॉ. झाकिया खान म्हणाल्या, ”फोर्टिसमध्ये आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सामना कराव्या लागणाऱ्या आरोग्यसंबंधित आव्हानांबाबत माहित आहे. उदयास आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक प्रमाणात माहिती उपलब्ध आहे आणि अधिकाधिक व्यक्ती ऑनलाइन आरोग्याबाबत मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, जे धोकादायक ठरू शकते. ही जागरूकता मोहिम ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आरोग्य व स्वास्थ्याबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी राबविण्यात आली आहे.”