गेल्या 2 महिन्यांपासून बांगलादेशचे वातावरण बरेच तापले आहे. वाढते आंदोलन आणि बिघडलेली परिस्थिती बघता बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेश सोडून त्या भारतात आल्या. या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ माजवली. बांग्लादेशात झालेली सत्तापालट बघता आता अनेकजण आवाक् झाले आहेत, याबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असाव्यात मात्र आज आपण लेखातून हसीना शेख नक्की कोण आहेत आणि त्यांच्या खडतर प्रवासाविषयी थोडी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बांगलादेशात 49 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1975 रोजी लष्कराने सत्तापालट केली होती. त्यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ‘गणभवन’मध्ये रक्ताच्या नद्या वाहत होत्या. शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची लष्करी उठावात त्यांच्याच घरी हत्या करण्यात आली होती. सध्या आरक्षणविरोधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा देत देश सोडला आणि त्या भारतात आल्या. मात्र त्यांची हृदयद्रावक कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
यावर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत शेख हसीना चौथ्या वेळी देशाच्या पंतप्रधान झाल्या. यावेळची त्यांची ही पाचवी टर्म होती. त्या जगातील सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या महिला सरकार प्रमुखांपैकी एक आहेत. घरातील सर्व सदस्यांच्या निधनांनंतरही त्या खचल्या नाहीत आणि पाय रोवून पुन्हा नव्या ताकदीने उभ्या राहिल्या.
हेदेखील वाचा – बांगलादेशच्या शेख हसीनाप्रमाणे ‘या’ देशांच्या प्रमुखांनीही सोडली आपली खुर्ची! भारतावरही अशी स्थिती येईल?
शेख हसीनाने एकेकाळी लष्करशासित बांगलादेशला स्थैर्य प्रदान केले होते. सप्टेंबर 1947 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये हसीना शेख यांचा जन्म झाला. त्यानंतर 1960 मध्ये त्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यावेळी त्या ढाका विद्यापीठात शिकत होत्या. .ऑगस्ट 1975 मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांची त्यांच्या घरात लष्करी अधिकाऱ्यांनी हत्या केली. यावं हल्ल्यात हसीना वाचल्या मात्र त्यांच्या परिवारातील इतर सदस्य या हल्ल्यात मारले गेले. हसीना या बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या मोठी मुलगी होत्या. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथे गेले. येथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
यानंतर त्या काही काळ सेगुन बगीचा येथेही राहिल्या. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी ढाका येथे स्थलांतरित झाले. सुरुवातीला त्यांना राजकारणात रस नव्हता. मात्र 1966 मध्ये जेव्हा त्या ईडन महिला महाविद्यालयात शिकत असताना त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. यानंतर त्यांनी वडील मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीग या विद्यार्थी संघटनेचे काम हाती घेण्याचे ठरवले. शेख हसीना ढाका विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातही फार सक्रिय होत्या.
1975 हे वर्ष शेख हसीना यांच्यासाठी फार दुर्दैवी ठरले. त्यावेळी बांगलादेश लष्कराने त्याच्या कुटुंबियांविरुद्ध बंड पुकारले. सशस्त्र सैनिकांनी शेख हसीनाची आई, तिचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्यावेळी शेख हसीना यांचा पती वाजिद मियाँ आणि लहान बहिणीसोबत युरोपमध्ये होते, त्यामुळे नशिबाने ते बचावले गेले. आई-वडील आणि तीन भावांच्या हत्येनंतर शेख हसीना काही काळ जर्मनीत राहिल्या. त्यानंतर इंदिरा गांधी सरकारने त्यांना भारतात आश्रय दिला.