(फोटो सौजन्य: Youtube)
गणेशोत्सवाला अखेर सुरुवात झाली असून घराघरात आता गणेशाचे आगमन झाले आहे. चैतन्याने भरलेला हा सण सर्वांच्या आवडीचा आणि उत्साहाने भरलेला असतो. बाप्पाच्या आगमनाने श्रुष्टि बहरून जावी असे बहारदार वातावरण सर्वत्र असते. गणेशोत्सवात बाप्पाला खुश करण्यासाठी त्याच्या नैवेद्यात काही निवडक आणि त्याला प्रिय असणाऱ्या पदार्थांना विशेष महत्त्व असते आणि यातीलच सर्वात लोकप्रिय आणि बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक!
गणपती बाप्पाच्या नैवेद्यात मोदकांसोबत झटपट बनवा साजूक तुपातील अक्रोडचा हलवा, नोट करा रेसिपी
पारंपरिकरित्या हे मोदक तांदळाचे पीठ आणि गूळ-खोबऱ्याच्या मिश्रणाने तयार केले जातात, ज्यांना उकडीचे मोदक म्हटले जाते. हे मोदक बाप्पाला फार प्रिय! फार आधीपासून गणेशोत्सवात उकडीचे मोदक बनवण्याची परंपरा आहे पण जसजसा काळ बदलला तसतसे मोदकांचे इतर प्रकारही लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले. आजकाल फक्त उकडीचे मोदकच नाही तर मावा, ड्रायफ्रूट, चॉकलेट असे अनेक प्रकारचे मोदक बनवून बाप्पाला अर्पण केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फ्युजन आणि चविष्ट अशा मोदकांची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे मोदक घरी बनवून तुम्ही सणाचा गोडवा आणखीन वाढवू शकता.
साहित्य :
कृती :
माव्यात तूप टाकून परता. त्यात पिठीसाखर व कोको पावडर घाला. नीट मिक्स करून मिश्रण थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात भरून चॉकलेट मोदक तयार करा.
साहित्य :
कृती :
ओरिओ बिस्किट पूड करून त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून मळून घ्या. मिश्रण गुळगुळीत झाले की साच्यात भरून ओरिओ मोदक तयार करा.
साहित्य :
कृती :
खवा परतून घ्या. त्यात गुलकंद, सुका मेवा व वेलची पूड मिसळा. पान बारीक चिरून टाका. हे मिश्रण साच्यात भरून पान मोदक तयार करा.
साहित्य :
बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड – १ कप (चिरून)
खजूर – ½ कप (बी काढून)
तूप – २ चमचे
वेलची पूड – ¼ चमचा
कृती :
सर्व सुका मेवा थोडा भाजून घ्या. त्यात खजूर व वेलची पूड टाका. तुपात परतून मिश्रण साच्यात भरून पौष्टिक ड्रायफ्रूट मोदक बनवा.
साहित्य :
व्हॅनिला आइसक्रीम – १ कप
चॉकलेट सिरप – २ चमचे
क्रश्ड ड्रायफ्रूट – ¼ कप
कृती :
आइसक्रीम थोडे मऊ करून त्यात सिरप व ड्रायफ्रूट मिसळा. मोदकाच्या साच्यात घालून फ्रीझ करा. थंडगार आइसक्रीम मोदक तयार! हे ५ फ्युजन मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवले की गणेशोत्सवाचा गोडवा दुप्पट होतो.