प्रेमप्रकरणातही Gen Z दोन पावलं पुढे; त्यांचा हा 'बेंचिंग ट्रेड' कधी ऐकलात का? सौजन्य : चॅट जीपीटी
प्रेम म्हणजे काय हो? अल्लड वयात आपसूक घडणारी एक सुखद घटना. तारुण्याच्या वाटेवर असंख्य भावविश्व निर्माण करणारं एक अनाकलनीय शास्त्र. 80-90 च्या दशकात चित्रपटांच्या माध्यमातून प्रेमाची व्याख्या विविधरित्या दाखवण्यात आली. पण आता ती व्याख्या हळुहळू पुसट होऊ लागली आहे. कारण हा जमाना Gen Z चा आहे.
सध्या Gen Z हे दोन शब्द कानावर पडताच, 90 च्या दशकात ऐलियनच्या गोष्टी जशा रंगवून सांगितल्या जायाच्या, त्याची प्रचिती येते. मानवानं जन्माला घातलेलं एक वेगळेच रसायन. त्यांचं विश्व हे त्यांनाच ठाऊक. सर्वात अग्रेसर. मग प्रेमप्रकरणात कसं मागे पडतील. त्यातही हे भावडे दोन पावलं पुढे असून त्यांच्यात एक नवा ट्रेड रंगत आहे. ‘बेंचिंग ट्रेड’ असं एक छान नावही त्याला सुचवलं गेलं आहे.
सध्याच्या काळात डेटिंग करताना एखादी व्यक्ती आवडण आणि त्याला आपल्या आयुष्यात जागा देणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी ठरत आहेत. अनेक वेळा एखादी व्यक्ती आपल्याशी संवाद साधतो, फ्लर्ट करतो, आपली विचारपूस करतो, पण नात्याबाबत काही स्पष्ट संकेत देत नाही.
आपल्याला वाटते एखाद्यावेळेस गोष्ट पुढे जाऊ शकते, पण समोरची व्यक्ती आपल्याला पूर्णतः आपलं समजत नाही आणि लांबही जाऊ देत नाही. डेटिंगच्या जगात याच प्रकारच्या वागणूकीला (बेंचिंग) असं म्हणले जाते.
बेंचिंगचा अर्थ एखाद्या व्यक्तीला नात्यात आपली पहिली पसंती म्हणून निवडण्याऐवजी बॅकअप ऑप्शनप्रमाणे ठेवणे. जसं की, क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला ग्राउंडवर खेळवण्याऐवजी बेंचवर बसून आपली वेळ केव्हा येईल याची वाट पहावी लागते. अशाचप्रकारे हे Gen Z डेटिंगमध्ये कोणालाही वाट पाहण्यास लावतात.
इंतजार हा खूप छान उर्दू शब्द आहे. पण या शब्दामुळे अनेकांचं जीव टांगणीला पडलेला असतो. बेंचिंग ट्रेडमध्ये समोर येणारा व्यक्ती आपल्यासोबत मध्ये मध्ये संवाद असतो वा अचानक मॅसेज करून आपल्यातील इंटरेस्ट दाखवतो. पण जेव्हा गोष्ट भेटण्याची, कमिटमेंटची किंवा नातं पुढे नेण्याची येते, तेव्हा तो अचानक माघार घेतो.
समजा की, आपण एखाद्या व्यक्तीसोबत अनेक दिवस बोलत आहात. तो तासनतास आपल्याशी चॅटवर बोलत असतो, पण तो अचानक अनेक दिवस गायब राहतो. जेव्हा आपणही त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा पुन्हा अचानक त्याचा किंवा तिचा पुन्हा मॅसेज येतो.
अगं कशी आहेस? अरे कसा आहेस ? अथवा खूप दिवसांपासून आपला संवादही झाला नाही असं काही तरी त्या मॅसेजमध्ये असते. आपल्याला वाटतं की, एखाद्यावेळेस तो आपल्याबाबत सीरियस होत आहे, पण काही वेळेनंतर पुन्हा तो किंवा ती अचानक गायब होते.
Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा
वर सांगितल्याप्रमाणे Gen Z हे वेगळ्याच प्रकारचं रसायन आहे. त्यांचं स्वतःच एक विश्व असून शिक्षणातून त्यांना लवकरच व्यवहारीक जीवत अवगत झालं आहे. त्यामुळे एखाद्यासोबत कसं वागावं हे त्यांना ठाऊक असते. आता एखादी व्यक्ती आपल्याशी बोलता बोलता अचानक गायब होते, तेव्हा त्याला किंवा तिला वाटते की, त्याचं कुठे तरी प्रेमप्रकरण सुरू असेल व आपण काय फक्त त्याच्यासाठी दुसरं पर्याय असू.
दरम्यान, मॅसेजवर उशीराने उत्तर येणे अथवा संवाद कमी साधणे हे काही बेंचिंग नाही. खरी गोष्ट त्याला सातत्याने येणारा अनुभव, त्याची वागणूक व त्याच्या इराद्यांचा आहे.
काही जणांना एकटं रहायचं नसते. काही जणांना आपले ऑप्शन ओपन ठेवायचे असतात आणि काही जणांना हे कळत नाही की, त्यांना हे नातं हवं की नको? सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवर नव्या लोकांच्या गाठीभेटींमुळे काही जण एकाच वेळी अनेकांसोबत संवाद (चॅट) साधत असतात.
तसंच जर कोणी वारंवार आपल्यात रस असल्याचे दाखवत असेल, पण भेटण्याचा प्लान करत मग ते टाळत असेल, अथवा रिलेशनशिपसारख्या मुद्यांवर बोलण्यास टाळत असेल, तर त्याच्या या व्यवहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. अशात स्वतःला गुंतवूण ठेवण्याऐवजी थेट समोरच्याला विचारा की, त्यांना या नात्यातून नेमकं काय हवं आहे. तू असं का वागत आहेस?
एखाद्या व्यक्तीला आपण आवडलंच पाहिजे, यासाठी सारखं त्याचं लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. अशात तुम्हाला जर ती समोरील व्यक्ती फक्त तिच्या मोकळ्या वेळेत आठवण करत असेल तर तुम्ही आता हे विचार करण्याची गरज आहे की, आपणही त्याला तेवढ्याच पुरता आपल्या आयुष्यात जागा देणं महत्त्वाचे आहे. बाकी Gen Z खूपच हुशार आहे.
Ans: डेटिंगमध्ये एखाद्या व्यक्तीला नात्यात प्राधान्य न देता बॅकअप पर्याय म्हणून ठेवणे, अधूनमधून संवाद साधून तिची आशा कायम ठेवणे, याला ‘बेंचिंग’ म्हणतात.
Ans: सोशल मीडिया, डेटिंग अॅप्स, एकाच वेळी अनेक व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी आणि नात्याबाबत निर्णय घेण्यातील संभ्रम यांमुळे हा ट्रेंड दिसून येतो.
Ans: ती व्यक्ती वारंवार संवाद साधते, आपल्यात रस असल्याचे दाखवते; मात्र भेटण्याचे नियोजन, कमिटमेंट किंवा नाते पुढे नेण्याची वेळ आली की टाळाटाळ करते. असे वर्तन सातत्याने दिसत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे.






