फोटो सौजन्य - Social Media
स्वप्न दोषाची समस्या जास्तकरून किशोर अवस्थेतील पुरुषांमध्ये पाहायला मिळते. स्वप्न दोष जरी सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अनेक तरुण याने त्रासले आहेत. जर या त्रासला वारंवार सामोरे जात असाल तर काहीना काही पाऊले उचलणे अनिवार्य आहे. स्वप्न दोषामध्ये निद्रा अस्वस्थेत असताना नकळत वीर्य उत्सर्जन होते. स्वप्नांच्या माध्यमातून शरीरात ही प्रक्रिया घडत असते. जर हे वारंवार असे घडत असेल तर व्यक्तीच्या जीवनशैली आणि सेक्स्युअल लाईफ यामध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळतात. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येपासून वाचण्यासाठी काही पद्धती आहेत, ज्यांचे अवलंब करणे फायद्याचे ठरू शकते.
नियमित व्यायाम स्वप्नदोष रोखण्यास मदत करू शकतो. जर या त्रासाला सामोरे जात असाल तर नियमित व्यायाम करत चला. आहारात कसलीही कमतरता असू देऊ नका. संतुलित आहार घेत चला. आहारात पोषकतत्वांसाठी बिलकुल हयगय करू नका. बताश्यात गायीचे दूध मिसळून प्यायल्याने स्वप्नदोषाची समस्या दूर होते. तसेच काही घरगुती उपाय आहेत, ज्यांच्यपासून या समस्येत फार मोठा आधार मिळतो.
‘या’ खाद्य पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकता
तसेच असे काही व्यायाम आहेत, ज्यांच्या साहाय्याने व्यक्ती स्वप्न दोषाच्या त्रासापासून मुक्त होऊ शकतो. किंवा या व्यायामाच्या आधारे स्वप्न दोष बऱ्यापैकी कमी करण्यास मदत होईल. या व्यायामाला पेल्विक फ्लोर व्यायाम असे म्हणतात. केगेल व्यायाम पेल्विक फ्लोरच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी आणि अनवधानपूर्वक स्खलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करू शकतात. तसेच व्यायामसोबत काही औषधांच्या सहाय्याने या त्रासापासून मुक्त होता येते. अशा औषधांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. वाढत्या वयासह हा त्रास कमी होतो. पण प्रौढ वयातही हा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बताशा असाच खाल्ला जातो. मात्र तो प्रमाणात खाणं अत्यंत गरजेचे आहे. बताशामध्ये जास्त प्रमाणात साखर आढळते. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही पदार्थ खाणे चुकीचे ठरेल. कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा आणि मगच पुढचे पाऊल उचला, हे नेहमी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.