केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग १० रुपयांच्या जवस बियांचे घरीच तयार करा जेल
सर्वच महिला आणि पुरुषांना आपले केस सुंदर आणि मजबूत हवे असतात. केसांच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर दिसू लागल्यानंतर केसांची मूळ अतिशय कमकुवत आणि नाजूक होतात. केस विंचरताना सुद्धा खूप जास्त केस गळून पडतात. केसांना पोषण देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. पण चुकीचा आहार, पोषणाचा अभाव आणि चुकीच्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होऊन केस तुटण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. पण या केमिकल ट्रीटमेंट काहीकाळ केस सुंदर आणि चमकदार करतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा एकदा केसांच्या मुळांना आणि केसांना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
थंडीत सांध्यांमध्ये वेदना का होतात? नियमित फॉलो करा ‘या’ सवयी, अजिबात आखडणार नाहीत शरीरातील हाडे
खराब झालेली केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट, महागडे शॅम्पू किंवा सीरम लावले जातात. पण हे सर्व उपाय करण्याऐवजी केसांना आतून पोषण द्यावे. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला जवस बियांचा वापर करून हेअर जेल तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले हेअर जेल आठवड्यातून दोनदा केसांवर लावल्यास केस अतिशय सुंदर होऊन केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस चमकदार दिसतील.
हेअर जेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात जवस बिया घालून उकळवून घ्या. बिया व्यवस्थित उकळल्यानंतर पाण्याचे रूपांतर हळूहळू जेलमध्ये होईल. त्यानंतर लगेच गॅस बंद करून तयार केलेले जेल गाळून घ्या. जवसाच्या बियांचे मिश्रण थंड होण्याआधी लगेच गाळून घ्यावे, अन्यथा जेल व्यवस्थित तयार होणार नाही. तयार करून घेतलेल्या हेअर जेलमध्ये तुमच्या आवडीचा कोणताही हेअर मास्क मिक्स करून घ्या.
तयार केलेला हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित फणीच्या साहाय्याने विंचरून घ्या. त्यानंतर तयार केलेला हेअर मास्क केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हे मास्क १ तास तसाच ठेवून द्या. त्यानंतर शॅम्पूचा सहाय्याने केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस अतिशय चमकदार आणि सुंदर होतील. हा हेअर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर लावल्यास केस अतिशय चमकदार दिसतील.






