Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
स्वयंपाकघरात सगळ्यात जास्त खराब दिसणारी वस्तू म्हणजे तेलाची किटली आहे. रोज तेल हाताला लागून किटलीवर तेल सांडतं आणि ते तसंच सुकून जातात. मग त्यावर काळा, चिकट थर बसतो. कितीही साबणाने घासा, तो काही निघतच नाही. तळलेलं तेल तर जास्तच चिकट असतं, त्याचा डाग तर अजून हट्टी होतो. सण आले की घराची साफसफाई करतो, पण ही किटली तशीच राहून जाते.
आता मार्केटमधून महागडं लिक्विड आणायची काही गरज नाही. घरातच असलेल्या लिंबू, मीठ आणि खाण्याचा सोडा या तीन गोष्टींनी ही किटली अगदी नवीन सारखी चमकू लागेल. ही टिप Raavi’s Recipe यांनी सोशल मीडियावर सांगितली आहे. Oil Kettle Cleaning Tips:
किटली साफ करायला फार वेळ लागत नाही. फक्त पाच मिनिटाचं काम आहे.पहिलं म्हणजे किटलीत जर तेल उरलं असेल तर ते आधी एका वाटीत काढून घ्या. रिकामी करा.आता किटलीच्या बाहेर जिथे जिथे चिकट डाग आहेत तिथे थोडा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा टाका. त्यावर थोडं साधं मीठ शिंपडा.आता एक लिंबू कापून त्याचा रस त्या सोडा-मीठावर पिळा.
पिळताच त्याचा फेस होईल. घाबरू नका, तसंच होतं. हाच फेस त्या तेलकटपणाला मऊ करतो.हे मिश्रण तसंच 3-4 मिनिटं राहू द्या. लगेच घासू नका. 4 मिनिटानंतर एक मऊ स्पंज घ्या किंवा स्क्रबर घ्या आणि हलक्या हाताने घासा. जोरात घासायची गरज नाही. तुम्ही बघाल की तो काळा थर अगदी सहज निघतोय. जर तुमची किटली प्लास्टिकची असेल किंवा रंगीत असेल तर आधी थोड्याशा भागावर करून बघा, स्क्रॅच पडतोय का ते बघा.
तेलाला सगळ्यात लवकर गरम पाण्याने निघते. गरम पाण्याने तेल पातळ होतं आणि लवकर निघतं. त्यामुळे घासून झाल्यावर गरम पाणी घ्या आणि त्यात थोडं भांड्याचे लिक्विड किंवा पावडर टाका. त्या पाण्याने किटली आतून बाहेरून व्यवस्थित धुवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर किटली प्लास्टिकची असेल तर उकळतं पाणी टाकू नका. कोमट पाणी वापरा. स्टीलची असेल तर गरम पाणी चालेल. फक्त बाहेरच घासा.
फक्त बाहेरच्या डागांसाठी जास्त चांगला आहे. आतून किटलीत आपण खायचं तेल ठेवतो, त्यामुळे आत साबणाचा वास राहिला नाही पाहिजे. आतून धुवायची असेल तर फक्त गरम पाणी आणि थोडं लिक्विड वापरा आणि नंतर 2-3 वेळा साध्या पाण्याने धुवा म्हणजे साबण पूर्ण निघून जाईल.धुतल्यानंतर किटली लगेच फडक्याने पुसून पूर्ण कोरडी करा आणि मगच त्यात परत तेल भरा. ओली असेल तर तेल खराब होईल.
Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी






