मधुमेहापासून आराम मिळवण्यासाठी जेवल्यानंतर 'हा' पदार्थ खा चावून
स्वयंपाक घरात सर्वच प्रकारचे मसाले उपलब्ध असतात. या मसाल्यांचा वापर चहा किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. भारतातील मसाले जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. या मसाल्यांची चव, रंग आणि सुगंध अतिशय सुंदर असल्यामुळे जेवण बनवताना वापर केला जातो. मसाल्यातील पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा मसाला म्हणजे लवंग. लवंगचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी सुद्धा केला जातो. लवंगचे सेवन केल्यामुळे दातांचे दुखणे थांबते. आयुर्वेदामध्ये लवंगला विशेष महत्व आहे. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मसाल्यांचा वापर करून काढा तयार केला जातो. आज आम्ही तुम्हाला लवंग चावून खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, लक्ष न दिल्यास उद्भवेल मृत्यू
जंक फूड किंवा तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे अपचनाची समस्या दूर करण्यासाठी लवंग खावी. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. लवंग खाल्यामुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो.लवंग खाल्यामुळे पोटात होणारी जळजळ कमी होऊन आतड्यांचे कार्य सुधारते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
दात दुखी, हिरड्यांमधील वेदना, दातांवर पिवळा थर साचून राहणे, कीड लागणे इत्यादी अनेक समस्यांपासून लवंगचे सेवन करावे. याशिवाय दातांमध्ये कीड लागल्यास लवंग रात्रभर दातांमध्ये ठेवावी. यामुळे कीड नष्ट होऊन दात स्वच्छ होईल. नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि वेदनाशामक म्हणून लवंग दातांसाठी प्रभावी ठरते. लवंग तेलाचा वापर करून तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय लवंग तेल माउथवॉश म्हणून सुद्धा वापरले जाते.
साथीचे आजार किंवा सर्दी, खोकला झाल्यानंतर लवंगचा काढा प्यावा. लवंगचा काढा प्यायल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारतात आणि साथीच्या आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ देत नाहीत.
गरोदरपणात बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा तात्काळ आराम
नैसर्गिक वेदनाशमक म्हणून लवंग तेलाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म सांध्यांमधील सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय थकवा आणि अंगदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. लवंग तेल शरीराला लावल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. अंघोळीच्या पाण्यात थेंबभर लवंग तेल टाकून मिक्स करून अंघोळ केल्यास शरीराचा थकवा कमी होईल.