दक्षिण भारतासह इतर राज्यांमध्ये केळीच्या पानावर जेवण जेवले जाते. प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा अजूनही जपली जात आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक लोक भांड्यात न जेवता केळीच्या पानावर जेवतात. यामुळे जेवलेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते. तसेच केळीच्या पानामध्ये ठेवले अन्न हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहता येते. केळीच्या पानामध्ये देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. आयुर्वेदामध्ये सुद्धा केळीच्या पानाला विशेष महत्व आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केळीच्या पानात जेवले जाते. केळीच्या पानामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. केळीच्या पानात अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया.
केळीच्या पानाचे आरोग्यदायी फायदे:
पचनक्रिया सुधारते:
केळीच्या पानामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी यांसारखे घटक आढळतात. त्यामुळे केळीच्या पानामध्ये असलेले घटक अन्नपदार्थांमध्ये मिक्स होतात. ज्यामुळे अन्नपदार्थाची चव वाढते. तसेच केळीच्या पानांमध्ये विषाणू प्रतिबंधक गुणधर्म असतात ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. घरी जेवतानाभांड्यात जेवण्याऐवजी केळीच्या पानामध्ये जेवण जेवा.
[read_also content=”नाश्त्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर झटपट बनवा गूळ पराठा https://www.navarashtra.com/lifestyle/instantly-make-jaggery-paratha-at-home-541303.html”]
वजन कमी करण्यास मदत करते:
केळीच्या पानामध्ये विटामिन बी मुबलक प्रमाणात आढळून येते. जे वजन नियंत्रणात मदत करते. तसेच यामुळे भूक नियंत्रणात राहते. इतर पानाच्या तुलनेत केळीची पाने हानिकारक नसतात. त्यामुळे अन्न जेवल्यानंतर तुम्ही पाने गाईगुरांना खाण्यासाठी देऊ शकता.
जीवनसत्वांचा चांगला स्रोत:
केळीच्या पानामध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आढळून येतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.तसेच केळीची पाने पर्यावरणपूरक असल्याने जेवणासाठी तुम्ही ही पाने वापरू शकता. प्लास्टिक किंवा इतर भांड्यांचा वापर करण्याएवजी केळीच्या पानांचा वापर जेवण्यासाठी करावा. तसेच या पानांवर जेवल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता फार कमी असते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.
[read_also content=”आंबट फळाची साल ठरेल कमाल, 20 मिनिट्समध्ये मानेवरील काळ्या डागाचे नामोनिशाण नष्ट https://www.navarashtra.com/lifestyle/use-orange-peel-to-remove-blackness-on-neck-541247.html”]
जंतुनाशक:
केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे अन्नपदार्थामधील विषाणू नष्ट करण्यास मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.