पोट- मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी 'या' डाळीच्या पाण्याचे नियमित करा सेवन
जगभरात लाखो लोक लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. पोट आणि मांड्यांवर चरबी वाढल्यानंतर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीर आणि मांड्यांवर अनावश्यक चरबी वाढू लागते. चरबीचा थर वाढल्यानंतर काहीवेळा मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. वजन वाढल्यानंतर अनेक लोक तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात तर काहीजण वेगवेगळ्या सप्लिमेंटन्सचे सेवन करतात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
महिलांमधील PCOS ची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘या’ बिया, वाढलेले वजन होईल महिनाभरात कमी
प्रत्येक स्वयंपाक घरात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतात. तूरडाळ,मुगडाळ, मसूर डाळ इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी स्वयंपाक घरात असतात. या डाळींचा वापर करून वेगवेगळे अनेक पदार्थ बनवले जातात. डाळींचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. शरीरासाठी डाळी डिटॉक्सिफाईंड एजंटप्रमाणे काम करतात. डाळींमध्ये फायबर आणि फॅट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. साथीच्या आजारांपासून शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी डाळींचा आहारात समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला कोणत्या डाळींच्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याच्या सेवनामुळे सेवन शरीराला अनेक फायदे होतात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी हिरव्या मुगाच्या डाळीचे सेवन करावे. डाळीचे पाणी तयार करून नियमित प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. हिरवे मूग खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. वजन कमी करण्यासाठी हिरव्या मुगाचे सेवन सालीसकट करावे. डाळींमध्ये असलेले फॅट्स आतड्या सहज पचवतात. मुगाच्या डाळींमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे मुगाची डाळ सहज पचन होते. मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. सकाळी उठल्यानंतर नियमित मुगाच्या डाळीचे पाणी प्यायल्यास भूक लागत नाही. पोट जास्त वेळ भरलेले राहते.
हिरव्या मुगाच्या डाळींचे पाणी नियमित प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे गॅस कमी होतो. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीया निर्माण करण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते. याशिवाय सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस वाढतो, अशावेळी मुगाच्या डाळीचे पाणी प्यावे. ओव्हरइटींग टाळण्यासाठी तुम्ही नियमित डाळीचे पाणी पिऊ शकता. यामध्ये असलेले फायबर शरीरास खूप महत्वाचे आहेत. शरीरातील फॅट्स मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी मुगाच्या डाळीचे पाणी प्यावे.
लठ्ठपणा म्हणजे काय?
लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
लठ्ठपणाची कारणे काय आहेत?
जास्त कॅलरी असलेले अन्न खाणे आणि कमी शारीरिक हालचाल हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. नियमित व्यायाम न केल्याने शरीरातील अतिरिक्त ऊर्जा चरबी म्हणून साठते.
लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य धोके:
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, काही प्रकारचे कर्करोग, झोपेचे विकार.