हिरवे मूग खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
अनेक लोक रोजच्या आहारात नियमित कडधान्यांचा समावेश करतात. त्यात मूग, मटकी, चणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी इत्यादी धान्यांचा समावेश केला जातो. ही कडधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यातील मूग हे कडधान्य सगळ्यांचं आवडते. लहान मुलांच्या भरडीपासून ते भाजी, पराठे, सूप बनवण्यासाठी मुगाचा वापर केला जातो. जेवणात योग्य मसाले आणि डाळींचा वापर केला तर जेवणाची चव आणखीन सुंदर लागते. हिरव्या मूगांमध्ये प्रथिने, फायबर, विटामिन बी, पोटॅशियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी पौष्टिक घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. हिरवे मूग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. शिवाय हिरव्या मुगाचे इतरही गुणकारी फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हिरव्या मूगांमध्ये भरपूर प्रोटीन आढळून येते. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. नियमित सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी हिरवे मूग खाल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होते. तसेच हाडांच्या आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी नियमित हिरव्या मुगाचे सेवन करावे. तसेच यामध्ये अमीनो ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते.
हे देखील वाचा:या आजारामुळे गालावर आणि नाकावर येतात काळे डाग! दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय येतील कामी
मुगाच्या डाळीचे किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. हिरवे मूग खाल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. वाढलेल्या वजनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात नियमित मुगाचे सेवन करावे.
मूग खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कारण हिरवे मूग पचनास हलके असतात. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. पचनक्रियेसोबतच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात मुगाचे सेवन करावे.
हिरवे मूग खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात मुगाचे सेवन करावे. मूग डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी या डाळीचे सेवन करावे.
हे देखील वाचा:रिकाम्या पोटी दूध प्यावे की नाही? जाणून घ्या..
वाढत्या आजरांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात मुगाचे सेवन करावे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन सी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे इतर रोगांची लागण शरीराला होत नाही.