ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय
वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे,ब्लॅकहेड्स, मुरूम, पुरळ येणे या सामान्य समस्या आहेत. पण यातील प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे त्वचेवर आणि नाकावर ब्लॅकहेड्स येणे. नाकावर ब्लॅकहेड्स आल्यानंतर काळे काळे डाग दिसू लागतात. हे काळे मेकअप केल्यानंतर सुद्धा लपले जात नाही. ब्लॅकहेड्स आल्यानंतर त्वचेचे सौंदर्या खराब होऊन जाते.ब्लॅकहेड्स प्रामुख्याने नाकावर, कपाळाला आणि हनुवटीवर येतात. ब्लॅकहेड्स येणेमागे अनेक कारण आहेत. त्वचेच्या ओपन पोर्समध्ये जमा झालेली घाण, तेल, प्रदूषण इत्यादींमुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:दिवाळीमध्ये सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी घरीच तयार करा टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो
चेहऱ्यावर आलेले ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता., बेकिंग सोड्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग घालवण्यासाठी सुद्धा मदत करतात. तसेच त्वचा एक्सफोलिएट होते. त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढण्याचे आणि अतिरिक्त तेल कमी करण्याचे काम बेकिंग सोडा करतो. वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट नाकावर लावून हलक्या हाताने मसाज करून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
आठवड्यातून एकदा वाफ घेतल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील छिद्र उघडून त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. भांड्यात पाणी गरम करून वाफ घ्या. 10 ते 15 मिनिटं नॉर्मल गरम पाण्याची वाफ घेऊन त्वचा पुसून घ्या. यामुळे नाकावर आलेले ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होईल. हा नैसर्गिक उपाय केल्यास त्वचा खराब होणार नाही.
त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तुम्ही केळीच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी केळीची साल नाकावर चोळा आणि ५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. केळीची साल त्वचा नैसर्गिकरित्या स्क्रब करण्याचे काम करते. या सालीचा वापर केल्यामुळे त्वचा उजळू लागते. केळीची साल नाकावरील
ब्लॅकहेड्सला लावल्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.
हे देखील वाचा:या आजारामुळे गालावर आणि नाकावर येतात काळे डाग! दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय येतील कामी
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदात हळदीचा वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी केला जात आहे. हळदीपासून वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्टसुद्धा बनवले जातात. हळदीचा वापर करून नाकावर आलेले ब्लॅकहेड्स कमी करू शकता. यासाठी हळदीची पेस्ट तयार करून नाकावर लावा. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेचे बॅक्टरीयापासून नुकसान होत नाही.