अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
स्लीव्हलेस कपडे घालताना अनेक महिला खूप विचार करतात. स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. यामागे काही कारण सुद्धा आहेत. स्लीव्हलेस कपडे घातल्यानंतर काळे पडलेले अंडरआर्म्स चांगले दिसत नाहीत. काखेमध्ये काळेपणा वाढू लागल्यानंतर काखेमधील त्वचा काळी पडू लागते. पिगमेंटेशन, शरीरातील बदल, इत्यादी अनेक गोष्टींमुळे अंडरआर्म्स काळे दिसू लागतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काळ्या आणि पिगमेंटेड अंडरआर्म्सपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे पिगमेंटेशन कमी होऊन अंडरआर्म्स काळे दिसणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही स्लीव्हलेस ड्रेस घालू शकता.(फोटो सौजन्य-istock)
अंडरआर्म्स काळे पडल्यानंतर अनेक महिला काखेमध्ये क्रीम्स किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावतात. पण असे न करता कच्च्या दुधाचा वापर करावा. कच्च दूध लावल्यामुळे काळे झालेले अंडरआर्म्स पुन्हा उजळण्यास मदत होईल. यासाठी एका वाटीमध्ये कच्च दूध घेऊन कापसाच्या सहाय्याने ते अंडरआर्म्समध्ये लावून घ्या. त्यानंतर 15 मिनिटं ठेवून पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यामुळे काखेतील काळेपणा कमी होऊन त्वचा उजळलेली दिसेल.
हे देखील वाचा: ओठांभोवती वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी नियमित करा ‘या’ गोष्टींचा वापर
बरीच लोक संत्र्याची साल फेकून देतात, पण संत्र्यापेक्षा संस्त्र्याच्या साली आरोग्यासाठी गुणकारी आहे. या सालींचा वापर करून तुम्ही अंडरआर्म्समधील काळेपणा कमी करू शकता. यासाठी सुकवलेल्या संत्र्याची साल घेऊन त्याची पावडर बनवा. पावडरमध्ये दूध आणि गुलाब पाणी मिक्स करून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट काखेत लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.
अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात खोबरेल तेल आणि मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट अंडरआर्म्समध्ये लावून लिंबाच्या सालीच्या मदतीने चोळा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.
हे देखील वाचा: Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना
अंडरआर्म्समधील काळेपणा घालवण्यासाठी बटाटा प्रभावी आहे. बटाट्याची साल काढून बटाटा किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून अंडरआर्म्सला लावा. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर पाण्याचा वापर करून अंडरआर्म्स स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे अंडरआर्म्समधील काळेपणा कमी होईल.