काखेतील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि छान दिसायचं असत. सुंदर दिसण्यासाठी महिला आणि मुली सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर दिसते. मात्र कालातंराने पुन्हा एकदा त्वचा खराब होऊन जाते. त्याप्रमाणे महिला त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात, तशीच काळजी शरीराच्या इतर भागांची घेणे सुद्धा आवश्यक आहे. काखेतील काळेपणाच्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत. काखेमध्ये काळेपणा वाढल्यानंतर स्लिवलेस कपडे घालणे नकोसे वाटू लागते. शिवाय चारचौघांमध्ये गेल्यानंतर लाजिरवाणेपणा वाटतो. काखेतील काळेपणा झपाट्याने वाढू लागतो.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअर संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा
काखेतील काळेपणा वाढण्यामागे अनेक कारण आहेत. वातावरणात होणारे बदल, शरीरातील हार्मोनल असंतुलन, ब्लेडने शेव्हिंग करणे किंवा जास्त धूम्रपान केल्यामुळे काखेत काळेपणा वाढू लागतो. काखेमध्ये वाढलेले काळेपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण तरीसुद्धा काखेतील काळेपणा कमी होत नाही. शिवाय अनेकदा जास्त घाम आल्यामुळे काखेतून दुर्गंधीसुद्धा येते. ही दुर्गंधी घालवण्यासाठी महिला केमिकल प्रॉडक्ट वापरतात. पण असे कारण्यावेजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया काखेतील काळेपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.
स्किन केअर संबंधित बातमीसाठी इथे क्लिक करा