वजन कमी करण्यासाठी घरगुती पेय
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. वजन कमी न झाल्यामुळे अनेकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटावर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे कोणतेही कपडे घातल्यानंतर पोटाचा घेर मोठा दिसू लागतो. यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर दाखवले जाणारे किंवा इतर अनेक उपाय करून पाहतात. पण अनेकदा चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे वजनात घट होण्याऐवजी वजनात वाढ होत जाते. त्यामुळे वाढलेले वजन कमी कारण्यासाठीच आहारात घरगुती पदार्थांचा समावेश करा. घरगुती पदार्थांचा आरोग्यावर लगेच प्रभाव दिसून येतो. तसेच हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: उत्तानासन केल्याने काय फायदे होतात जाणून घ्या..
वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर घरगुती पेय बनवून प्या. यासाठी एका टोपात पाणी घेऊन त्यात बडीशेप, पुदिन्याची पाने आणि आल्याचा तुकडा टाकून पाण्याला व्यवस्थित उकळी येण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले पेय गाळून रिकाम्या पोटी नियमित प्या. यामुळे तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन आरोग्य सुद्धा सुधारेल.
बडीशेप मध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनक्रियेत बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बडीशेपच्या पाण्याचा समावेश करा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जाऊन वाढलेले वजन कमी होईल.
दाहक विरोधी गुणधर्म असलेलं आलं आरोग्यासाठी गुणकारी आहे.आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी वितळून वजन कमी होते. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात आल्याचा पाण्याचा समावेश करा.
पुदिन्याच्या पाण्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर जाणून पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहून लवकर भूक लागत नाही.