वजन कमी करण्यासाठी भाताऐवजी करा या पदार्थांचे सेवन
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक प्रयत्न करतात. पण वजन कमी होत नाही. लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवून शरीराला पचन होईल अशा हलक्या पदार्थांचे सेवन करावे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. भात खाल्यामुळे वजन वाढते असे अनेकांना वाटते. पांढऱ्या तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जीवन जगले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी भाताऐवजी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात भाताऐवजी गव्हाचे सेवन करावे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. रोजच्या आहारात चपाती किंवा गव्हापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गव्हामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चपाती खाल्यानंतर पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या सर्व पदार्थांचे सेवन करावे. पांढऱ्या रंगाचा ब्रेड खाण्याऐवजी आहारात गव्हाच्या ब्रेडचे सेवन करावे, ज्यामुळे आरोग्याला फायदे होतील आणि वजनही कमी होईल.
बाजरीची भाकरी सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही बाजरीचे सेवन करू शकता. बाजरी खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाजरी हे ग्लूटेन-मुक्त धान्य आहे. तसेच यामध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. बाजरीची भाकरी खाल्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि लवकर भूक लागत नाही.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लाल भाताचे सेवन करावे. पांढऱ्या भाताऐवजी लाल भाताचे सेवन केल्यास आरोग्य सुधारेल. लाल रंगाच्या भातामध्ये पांढऱ्या रंगाच्या भातापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. रोजच्या आहारात फायबर युक्त भाताचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडत नाही आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी नेहमी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे.






