पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय
७ सप्टेंबरला ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले होते. त्यानंतर बाप्पाची विधिवत पूजा करून, बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबईपुरी आनंदी झाली होती. त्यानंतर 11 दिवसांचा गोड पाहुणार घेऊन बाप्पा आपल्या घरी गेले. काल गणपती बाप्पाचे थाटमाट विसर्जन करण्यात आले. गणपती उत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा सण. गणपती बाप्पाच्या आगमनाला जेवढा जल्लोष केला जातो जातो तेवढाच जल्लोष विसर्जन सोहळ्यात सुद्धा केला जातो. विसर्जन सोहळ्यासाठी ढोल ताशा, डीजे इत्यादी गोष्टी लावल्या जातात. विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक लोक भान हरपून बेभान होऊन नाचतात.
विसर्जन मिरवणुकीमध्ये पाच सहा तास नाचल्यानंतर घरी गेल्यावर अंग दुखी, पाठ दुखी, पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर सकाळी झोपेतून उठण्याची इच्छा होत नाही. सकाळच्या वेळी पूर्ण अंग आखडून जात. रात्रभर अंग आणि पाठ दुखत असल्यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही. अशावेळी घरगुती उपाय करून अंग दुखीवर आराम मिळावा. चला तर जाणून पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
हे देखील वाचा: सकाळच्या चुकीच्या सवयी सडवू शकतात लिव्हर, वेळीच लक्ष न दिल्यास होईल डायबिटीस
पाय आणि अंग दुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा. यामुळे तुमचे पाय आणि अंग दुखी थांबेल. यासाठी कोमट पाण्यात २ चमचे मीठ टाकून पाण्यात सोडून बसा. तसेच अंघोळ करताना गरम पाण्यात मीठ टाका. यामुळे पायांचे दुखणे थांबेल.
जास्त पाय दुखत असल्यास पायांना तेल लावून मसाज करा. यामुळे तुमचे पाय दुखणार नाहीत. कोमट तेल लावून पायांना मसाज केल्यास शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. पायांना मसाज करण्यासाठी तुम्ही तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता.
थकून घरी आल्यानंतर सगळ्यात आधी आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा प्यायल्यामुळे ताण तणाव कमी होऊन आराम मिळतो. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात कमी झालेली ऊर्जा पुन्हा वाढण्यास मदत होते. तसेच आल्यामध्ये असलेले घटक आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहेत.
गणपती मिरवणुकीमध्ये नाचून किंवा थकून घरी आल्यानंतर हळदीचे दूध प्यावे. हळदीच्या दुधात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला आराम मिळतो. हळदीमधील घटक अशरीरातील वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात.
हे देखील वाचा: जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास का दिले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
मिरवणुकीमध्ये नाचून पायांना काहीवेळा सूज येते. सूज आल्यानंतर पायांमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुती कापडामध्ये बर्फाचा खडा घेऊन पाय शेकवावावे. यामुळे पायांची वेदना कमी होईल. सुज कमी होऊन आराम मिळेल.