नखांना चिटकलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय
पांढरे केस काळे करण्यासाठी महिला केसांना रंग किंवा डाय लावतात. यामुळे केस काही दिवसांपुरते काळेभोर आणि सुंदर दिसतात. पण पुन्हा एकदा केस पांढरे झाल्यानंतर केस काळे करण्यासाठी डाय लावला जातो. काही डाय लावण्यासाठी ब्रशचा वापर न करता हातांचा वापर करतात. यामुळे हेअर डाय संपूर्ण हाताला आणि नखांना लागतो. केसांना मेहंदी किंवा रंग लावल्यानंतर केस सुंदर आणि उठावदार दिसतात. पण नखांना लागलेले मेहंदी किंवा हेअर डायचे डाग लवकर निघून जात नाही. हेअर डायचा रंग नखांमध्ये तसाच चिटकून राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेअर डायचा रंग चिटकून खराब झालेली नखं स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे नखांमधील हेअर डायचा रंग कायमचा निघून जाईल आणि नखं स्वच्छ होतील.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नखांवर चिटकून राहिलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी साखरेचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये साखर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण नखांना स्क्रब म्हणून लावा आणि हलक्या हाताने नखांवर मसाज करा. त्यानंतर काहीवेळ ठेवून झाल्यानंतर नखं पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे नखांवर लागलेला डाय निघून जाण्यास मदत होईल आणि नखं स्वच्छ होतील.
बेकिंग सोड्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. शिवाय यामध्ये असलेले गुणधर्म नखांवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करतील. वाटीमध्ये चमचाभर बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी टाकून जाडसर पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट नखांवर लावून हलक्या हाताने चोळून घ्या. १५ मिनिटं झाल्यानंतर पाण्याने नखं स्वच्छ करून घ्या. हा उपाय केल्यामुळे नखांवर चिटकून राहिलेला डाय किंवा रंग निघून जाण्यास मदत होईल.
नखांवर चिटकून राहिलेला मेहंदीचा रंग काढून टाकण्यासाठी ऑलिव्ह ऑईल गुणकारी आहे. यासाठी वाटीमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर नखांवर लावून व्यवस्थित चोळून घ्या. यामुळे नखांवर लागलेला रंग किंव डाय निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळ नखांवर हे मिश्रण तसेच ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून टाका.
स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे नखांवरील किंवा त्वचेवरील डाग निघून जातात. खोबरेल तेल गरम करून कोमट झाल्यानंतर नखांवर लावून घ्या. १० मिनिटं तसेच ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे नखांवरील रंग निघून जाण्यास मदत होईल.