फोटो सौजन्य - Social Media
राहुलने आराम करायचे ठरवले आणि स्टिअरिंगची धुरा आता भरतच्या हातात होती. Ambulance सुसाट वेगात होती तेव्हा भरतचे लक्ष साईड मिररवर गेले, त्याने पाहिले की मागच्या केबिनमधून एक व्यक्ती जो रुग्णाच्या शेजारी बसला आहे तो सतत भरतकडे पाहत आहे. भरतने आधी त्याला दुर्लक्ष केले पण पाहता-पाहता १५ मिनिटे झाली. तो माणूस त्याच्याकडे सलग पाहत आहे. त्याने पुन्हा त्याला दुर्लक्ष केले. हळूहळू तो व्यक्ती त्या भरतच्या शेजारी गियर बॉनेटवर येऊन बसला. भरतने त्याच्याशी एक शब्दही संवाद साधला नाही.
सकाळ झाली. भरतने गाडी रस्त्याशेजारी लावली. राहुलला झोपेतून उठवून पुढचा ५० किमीचा प्रवास तूच कर! असे म्हणत भरतने राहुलला प्रश्न केला की आपल्या गाडीत माणसं किती आहेत? राहुल बोलला ‘सहा!’ हे ऐकून भरत म्हणाला ‘वेडा आहेस का? एकूण सात माणसं आहेत. तो काय मागे तिथे पेशंटच्या बाजूला बसलाय.
आपल्याचकडे पाहतोय.’ राहुल सगळी गोष्ट समजून गेला होता, त्याने भरतला शांत केले आणि गाडी चालवून रुग्णाला त्याच्या घरी सोडले. परतीच्या वाटेवर गाडीत ते दोघेच असताना त्याने भरतला सांगितले. ही Ambulance आहे मित्र यात किती लोकं गेलीत-मेलीत, त्यामुळेया गोष्टी घडतच असतात. आपल्या गाडीत सहाच रुग्ण होते.






