• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Menopause Affects Womens Bone And Heart Health Women Health

रजोनिवृत्तीचा महिलांच्या हाडे आणि हृदयाच्‍या आरोग्‍यावर कशाप्रकारे परिणाम होतो? जाणून घेऊया सविस्तर

रजोनिवृत्तीमुळे विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. काही महिलांना पीरियडदरम्‍यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्‍याचे वाटू शकते, आत्‍म-शोधाची भावना जागृत होऊ शकते आणि पुढे काय घडणार याबाबत उत्‍सुकता निर्माण होऊ शकते. पण या टप्‍प्‍यादरम्यान महिलांच्‍या शरीरात बदल होण्‍यासोबत इस्‍ट्रोजेन पातळ्यांमध्‍ये घट होते

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2024 | 03:02 PM
रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्व महिलांना जीवनातील टप्‍प्‍यादरम्‍यान रजोनिवृत्तीचा सामना करावा लागत असला तरी अनेक महिलांना रजोनिवृत्तीमुळे त्‍यांचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित नाही. या स्थितीबाबत फारशी चर्चा करण्‍यात आलेली नाही, ज्‍यामुळे महिलांना जीवनातील या भावी टप्‍प्‍यासाठी सुसज्‍ज राहणे अवघड होते. रजोनिवृत्तीमुळे विविध प्रकारचे बदल होऊ शकतात. काही महिलांना पीरियडदरम्‍यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळण्‍याचे वाटू शकते, आत्‍म-शोधाची भावना जागृत होऊ शकते आणि पुढे काय घडणार याबाबत उत्‍सुकता निर्माण होऊ शकते. पण या टप्‍प्‍यादरम्यान महिलांच्‍या शरीरात बदल होण्‍यासोबत इस्‍ट्रोजेन पातळ्यांमध्‍ये घट होते हे लक्षात असणे देखील महत्त्वाचे आहे.(फोटो सौजन्य-istock)

या बदलांमुळे महिलांना रजोनिवृत्तीनंतर आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित असणे आवश्‍यक आहे. मुंबईतील सूर्या हॉस्पिटल येथील प्रसूती व स्‍त्रीरोग विभागाच्‍या संचालक डॉ. सुचित्रा पंडित म्‍हणाल्‍या, ”भारतातील रजोनिवृत्ती घेणाऱ्या महिलांवर आधारित संशोधनांमधून निदर्शनास आले की नोंदणी झालेली सर्वात सामान्‍य लक्षणे म्‍हणजे वेदनादायी चमक व रात्रीच्‍या वेळी घाम येणे, तसेच इतर लक्षणे जसे झोप न लागणे, चिंता, चिडचिड, सांधेदुखी आणि योनीमार्गात कोरडेपणा.इंडियन मेनोपॉज सोसायटीने केलेल्‍या संशोधनामध्‍ये या लक्षणांचे प्रमाण ७५ टक्‍के असल्‍याचे आढळून आले. या लक्षणांबाबत जागरूकता हळूहळू वाढत असली तरी आम्‍हाला अंदाज आहे की कमी महिलांना रजोनिवृत्तीचा आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित आहे.

हे देखील वाचा: या भाजीमुळे वाढू शकते यूरिक एसिडची समस्या

ज्‍यामुळे अधिकाधिक महिलांना रजोनिवृत्तीनंतरच्‍या सामान्‍य स्थितींबाबत माहित असण्‍याची अधिक गरज आहे. इस्‍ट्रोजेन पातळ्या कमी झाल्‍यामुळे महिलांना ऑस्टियोपोरासिस, हृदयसंबंधित आजार आणि मसल मास लॉसचा मोठा धोका असू शकतो. रजोनिवृत्तीच्‍या हाडे व हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत माहित असल्‍याने त्‍यांना परिणामांना ओळखण्‍यासोबत त्‍यावर प्रतिबंध ठेवण्‍यास किंवा लवकर निराकरण करण्‍यास मदत होऊ शकते.”

अबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी म्‍हणाल्‍या, ”महिलांना रजोनिवृत्तीचा हाडे व हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांबाबत समजण्‍यास मदत करणे महत्त्वाचे आहे. अॅबॉट व इप्‍सोसने केलेल्‍या सर्वेक्षणानुसार 82 टक्‍के व्‍यक्‍तींचा विश्‍वास आहे की रजोनिवृत्तीचा महिलांच्‍या वैयक्तिक स्‍वास्‍थ्‍यावर परिणाम होतो. यामुळे महिलांना रजोनिवृत्तीदरम्‍यान व त्‍यानंतरच्‍या काळामध्‍ये त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यास मदत करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. “

रजोनिवृत्तीनंतर होणारा सर्वात सामान्‍य आजार म्‍हणजे ऑस्टियोपोरोसिस, जो 50 वर्षांवरील तीनपैकी एका महिलेला होतो. इस्‍ट्रोजेनच्‍या पातळ्यांमध्‍ये घट झाल्‍यामुळे हा आजार होतो, परिणामत: हाडांची झीज होते व स्‍नायूबळ कमकुवत होते, ज्‍यामुळे ते तुटण्‍याचा धोका वाढतो.आज भारतातील जवळपास 61 दशलक्ष व्‍यक्‍तींना ऑस्टियोपोरोसिस आहे आणि त्‍यांच्‍यापैकी 80 टक्‍के महिला आहेत.ऑस्टियोपोरोससि हा ‘मूक आजार आहे, ज्‍यामध्‍ये फ्रॅक्‍चर होत नाही तोपर्यंत लक्षणे दिसून येत नाही. कधी-कधी उंची कमी होऊ शकते, ज्‍यासोबत पाठदुखी किंवा पाठीला पोंग येऊ शकते. ऑस्टियोपोरोसिसशी संबंधित दुखापती गंभीर असू शकतात आणि वेदना होण्‍यासोबत दीर्घकाळापर्यत विकलांगत्‍व येऊ शकते.डॉक्‍टरांसोबत सल्‍लामसलत आणि जोखीम घटक जाणून घेणे महत्त्वाचे ठरू शकते. हाडे मजबूत करण्‍यासाठी जीवनशैलीमध्‍ये काही बदल करता येऊ शकतात, जसे नियमितपणे व्‍यायाम करणे, फळे, भाज्‍यांचा समावेश असण्‍यासोबत कॅल्शियम व व्हिटॅमिन डी ने संपन्‍न आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करणे, धूम्रपान व मद्यपान न करणे.

रजोनिवृत्तीनंतर महिलांना स्‍नायूबळ कमकुवत होण्‍याचा देखील धोका असतो. वाढत्‍या वयासह हालचाल, संतुलन व ताकदीसाठी स्‍नायूबळ मजबूत असणे आवश्‍यक आहे. स्‍नायूबळ कमी होणे किंवा सार्कोपेनिया महिलांमध्‍ये झपाट्याने वाढत होते, रजोनिवृत्तीमुळे पुरूषांच्‍या तुलनेत जवळपास एक दशक अगोदर महिलांना त्‍यांचा त्रास होत आहे. यासोबत इतर गुंतागूंती देखील होतात जसे वजन कमी होणे आणि पायऱ्या चढण्‍यासारखी सोपी कामे करताना त्रास होतो. थकवा व ऊर्जा कमी होणे या चेतावणी लक्षणांकडे लक्ष द्या, त्‍यासंदर्भात डॉक्‍टरांचा सल्‍ला देखील घ्‍या. स्‍नायूबळ वाढवण्‍यासाठी सक्रिय पावले उचलू शकता, जसे ताकदीसाठी व्‍यायाम, स्‍नायूंसाठी फायदेशीर ठरणारे व्‍यायाम, पौष्टिक आहाराचे सेवन आणि पुरेशी झोप घेणे.

हे देखील वाचा: स्तनाच्या कर्करोगासाठी FISH Testing म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का आहे?

रजोनिवृत्तीनंतर हृदयविषयक आजाराचा धोका देखील वाढतो. यामागील कारण म्‍हणजे इस्‍ट्रोजेनच्‍या कमतरतेमुळे लिपिड पातळ्यांमध्‍ये बदल होऊ शकतात, जसे कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होऊ शकते.रजोनिवृत्तीशी संबंधित वेदनादायी चमक व रात्रीच्‍या वेळी घाम येणे यामुळे उच्‍च रक्‍तदाब आणि इतर कार्डियोव्‍हॅस्‍कुलर संबंधित जोखीम घटकांचा धोका वाढू शकतो.तसेच, वयाच्‍या उत्तरार्धात नैसर्गिकपणे रजोनिवृत्ती येणाऱ्या महिलांना कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजाराचा धोका कमी असतो. रजोनिवृत्ती लवकर येण्‍यास कारणीभूत असू शकणारे घटक म्‍हणजे प्रजनन काळामध्‍ये कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आरोग्‍य बिघडणे, धूम्रपान आणि शक्‍यतो अनुवांशिकता.संशोधनामधून देखील निदर्शनास येते की रजोनिवृत्तीदरम्‍यान नैराश्‍यामुळे कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजाराचा धोका उच्‍च असू शकतो.समुपदेशन, कॉग्निटिव्‍ह बीहेवीरल थेरपी किंवा माइंडफुलनेस पद्धतींच्‍या माध्‍यमातून या समस्‍यांचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे, तसेच सामाजिक पाठिंबा देखील महत्त्वाचा आहे.

थोडक्‍यात, वाढत्‍या वयासह महिलांनी नियमित तपासणी, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर आरोग्‍य तपासणी करणे महत्त्वाचे आहे. कोणत्‍या लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे माहित असल्‍यास तुम्‍ही व तुमचे प्रियजन रजोनिवृत्तीनंतर उत्तमप्रकारे जीवन जगू शकतात आणि जीवनातील या टप्‍प्‍याचा सहजपणे स्‍वीकार करू शकतात.

Web Title: How menopause affects womens bone and heart health women health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली ग्रीन टी ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक, अजिबात करू नका सेवन
1

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली ग्रीन टी ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक, अजिबात करू नका सेवन

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
2

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
3

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी
4

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway : “काळ आला पण वेळ आली नव्हती” ; मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्…. रेल्वेपायलटच्या प्रसंगावधाने अनर्थ टळला

Railway : “काळ आला पण वेळ आली नव्हती” ; मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्…. रेल्वेपायलटच्या प्रसंगावधाने अनर्थ टळला

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे खोल खड्ड्यात पडले अन्…

UP T20 League 2025: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

UP T20 League 2025: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.