एक्सपायर झालेलया औषधांची विल्हेवाट कशी लावावी
Expired Medicine Disposal:अनेकदा आपण डोकेदुखी, ताप किंवा कोणत्याही छोट्या-मोठ्या आजारासाठी औषधे घरी आणून ठेवतो आणि साठवत राहतो. परंतु कालांतराने तीच औषधे कालबाह्य होतात. आश्चर्य म्हणजे, बहुतेक लोकांना औषधाची मुदत संपल्यानंतर त्याचे काय करायचे हे माहित नसते. काही लोक ते न पाहता खातात, तर काही लोक ते कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण या कालबाह्य म्हणजे एक्सपायर झालेल्या औषधांचे नक्की काय करायचे, त्याची विल्हेवाट कशी लावायची,हेच आपल्याला माहिती नसते, या मुद्द्यावर डॉ. अरुण पाटील म्हणतात की, कालबाह्य झालेली औषधे योग्यरित्या नष्ट न केल्यास गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात शिवाय तीच औषधे पर्यावरणच्या प्रदूषणासही कारणीभूत ठरू शकता. त्यामुळे अशा औषधांचे काय करायचे, असाही प्रश्न उपस्थित होतो.
औषध फ्लश करू नका किंवा थेट कचऱ्यात टाकू नका. कालबाह्य झालेले औषधे सिंकमध्ये फ्लश केल्याने किंवा ओतल्याने पाणी दूषित होऊ शकते, ज्यामुळे सजीवांना आणि पर्यावरणाला हानी पोहोचू शकते.
औषध विल्हेवाट कार्यक्रमाचा भाग व्हा
मोठ्या शहरांमधील अनेक मेडिकल स्टोअर्स आणि रुग्णालये कालबाह्य झालेली औषधे गोळा करतात आणि त्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावतात.
घरी सुरक्षितपणे नष्ट करा
जर विल्हेवाट केंद्र नसेल, तर औषध माती, कॉफी पावडर किंवा चहाच्या पानांमध्ये मिसळा, ते जुन्या पॅकेटमध्ये ठेवा, ते व्यवस्थित सील करा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. औषधाच्या स्ट्रिप किंवा बॉक्सवरून त्याचे नाव आणि माहिती पूर्णपणे काढून टाका.पेन किंवा स्क्रॅचरने कंटेनर आणि स्ट्रिप्सवरून नाव आणि एक्सपायरी डेट काढून टाका, जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही.
औषधांची मुदत संपली आहे का ते कसे तपासायचे?
प्रत्येक औषधावर MFD (उत्पादन तारीख) आणि EXP (एक्सपायरी तारीख) लिहिलेली असते.बंद डब्यात असले तरी, औषधाची मुदत संपल्यानंतर ते वापरू नका. कालबाह्य झालेली औषधे केवळ कुचकामीच नाहीत तर शरीर आणि पर्यावरणासाठी धोकादायक देखील ठरू शकतात. म्हणून, प्रत्येक व्यक्तीने औषधांच्या कालबाह्य तारखेकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. थोडीशी जाणीव तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मोठ्या संकटापासून वाचवू शकते.
कालबाह्य औषधांचा या आजारांचा धोका?
डॉक्टरांच्या मते, कालबाह्य (एक्सपायरी) औषधे वापरणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. यामुळे केवळ औषधाचा प्रभाव कमी होत नाही, तर गंभीर आजार आणि प्रतिजैविक प्रतिकार (Antibiotic Resistance) निर्माण होण्याचा धोका वाढतो.एकदा औषधाची एक्सपायरी डेट निघून गेली की, त्या औषधाचा दर्जा, परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबत कोणतीही खात्री राहात नाही. त्यामुळे कोणतेही औषध वापरण्यापूर्वी त्याची मुदत काळजीपूर्वक तपासणे अत्यावश्यक आहे.
कालबाह्य औषधांमुळे होऊ शकणारे संभाव्य धोके:
मूत्रपिंड (किडनी) व यकृत (लिव्हर) विकार
त्वचेवर पुरळ, लालसर ठिपके, मुरुमे
अलर्जी, घशात खवखव, घशाचा दाह
उलट्या, मळमळ, अपचन
घबराट, श्वास घेण्यास त्रास
औषधांच्या तीव्र प्रतिक्रिया (Severe Drug Reactions)
काय काळजी घ्यावी?
प्रत्येकवेळी औषध घेताना एक्सपायरी डेट तपासा
औषध शंका वाटल्यास फेकून द्या; वापर टाळा
लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना औषध देताना विशेष दक्षता घ्या
चुकून कालबाह्य औषध दिल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा रुग्णालयात जा