शेवग्याच्या शेंगांचा कसा करावा वापर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)
शेवगा ही एक औषधी वनस्पती आहे, जी आयुर्वेदात एक शक्तिशाली औषधी वनस्पती मानली जाते. शतकानुशतके भारतीय औषधांमध्ये याचा वापर केला जात आहे. शेवग्याचे सर्व भाग जसे की पाने, शेंगा, फुले, बिया आणि साल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत असे मानले जाते आणि अगदी बाळाला शेवग्याच्या शेंग्याच्या सूपपासून अनेक पदार्थांचे सेवन दिले जाते. योगगुरू बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की ज्यांना हातपायांना मुंग्या येतात, व्हिटॅमिन बी १२ आणि बी कॉम्प्लेक्सची कमतरता असते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, शरीरात प्रथिनांची कमतरता असते त्यांच्यासाठी शेवग्याचे झाड खूप फायदेशीर ठरू शकते.
ही वनस्पती वेगवेगळ्या दोषांना शांत करण्याचे काम देखील करते असे त्यांनी आपल्या एका व्हिडिओत सांगितले आहे. शेवग्याचे काय फायदे आहेत? याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास, पचन सुधारण्यास, प्रथिनांची कमतरता दूर होण्यास मदत होते, असे रामदेव म्हणाले की, तुम्ही सूप, भाजी आणि रस बनवून याचा वापर करू शकता (फोटो सौजन्य – Instagram/iStock)
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
बाबा रामदेव म्हणाले की, शेवग्याच्या शेंगांचे सूप पिणे किंवा त्याची भाजी बनवून खाणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते. याशिवाय शेवग्याच्या शेंगा या शरीरातील वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना शांत करते. जर तुम्हाला नसा, रक्तवाहिन्या आणि मेंदूच्या मज्जासंस्थेची समस्या असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करायला हवे.
पचनशक्ती सुधारण्यास मदत
पचनशक्ती चांगली राहते
शेवग्याची पाने आणि बिया बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात. ते जठरासंबंधी अग्नि अर्थात पचन अग्नि वाढवते. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पचनक्रियेचा तुम्हाला त्रास होत असेल अथवा बद्धकोष्ठता असेल तर अशा व्यक्तींना मुद्दाम आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करून घ्यावा असा सल्ला बाबा रामदेव यांनी दिला आहे.
कमी वयात केस होत आहेत सफेद? बाबा रामदेवांनी दिले 5 सोपे उपाय, पांढरे केसही होतील काळे
डायबिटीससाठी फायदेशीर
शेवग्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. त्यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तप्रवाह सुधारते आणि रक्तदाब संतुलित करते. डायबिटीस रूग्णांनी नियमित याचे सेवन करावे
सूज असल्यास खाणे उत्तम
शेवग्याच्या शेंगेमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. मोरिंगाची साल आणि पाने संधिवात, सांधेदुखी आणि सूज यांमध्ये आराम देतात. याशिवाय, मोरिंगा तेल आणि पाने त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. शेवग्यांची शेंग ही शरीराला सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरते
कसा कराल वापर
वापर कसा करावा
बाबा रामदेवांनी सांगितले फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.