नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव महत्वाचे आहे. शरीरातील एका अवयवाचे कार्य बिघडले तर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. त्यामुळे चुकीच्या जीवनशैलीचा अवलंब न करता निरोगी जीवन जगले पाहिजे. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. पण लिव्हरमध्ये कोणताही त्रास होण्यास सुरुवात झाली तर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. हल्ली अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास जाणवू लागला आहे. फॅटी लिव्हर म्हणजे पोटामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा झाल्यानंतर लिव्हरचे कार्य पूर्णपणे मंदावते. आज आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे, असे अनेकांना वाटते. पण लिव्हरमध्ये जमा झालेली हीच चरबी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम लिव्हर करते. पण काही वेळा दारू किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन न करताच फॅटी लिव्हरमुळे आरोग्य बिघडते. फॅटी लिव्हरलाच लिव्हर स्टीटोसिस असे सुद्धा म्हणतात.
हे देखील वाचा: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणे
हे देखील वाचा: फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी चुकूनही आहारात करू नका ‘या’ पेयांचा समावेश, होऊ शकते आरोग्याचे नुकसान
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे
प्रत्येक स्वयंपाक घरात हळद ही असतेच. हळदीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हळदीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असलेली हळद अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. हळदीमध्ये असलेल्या करक्यूमिनमुळे आरोग्याला फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्यास लिव्हरमधील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे
अनेक लोक सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. ग्रीन टी मध्ये असलेला कॅटेचिन्स नावाचा घटक लिव्हरचा ताण कमी करण्यासाठी मदत करतो. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. तसेच ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे लिव्हर स्वच्छ होते.