खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या
धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. कधीही जेवणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वारंवार चुकीच्या पद्धतीने जीवनशैली जगल्यामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यातील प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरचा त्रास होऊ लागल्यानंतर सतत पोटात दुखणे, अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या जाणवू लागल्यानंतर वेळीच औषध उपचार घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी औषध उपचार न घेतल्यामुळे यकृत आणि सोरायसिसचा त्रास होण्यास सुरुवात होते. तसेच यकृताला जखमा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या कारणांमुळे फॅटी लिव्हरची समस्या जाणवते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. आरोग्यासंबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर वेळीच औषध उपचार घेणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, अतिरिक्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढून यकृताला धोका निर्माण होतो. चिप्स, पिझ्झा, बेकरी युक्त पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बाहेर मिळणारे पदार्थ खाण्याऐवजी धान्य, फळे, भाज्या, दही, प्रथिने इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: विटामिन बी ची कमतरता अशी होईल दूर
अनेकांना घरी बनवलेले पदार्थ खाण्यापेक्षा बाहेर मिळणारे विकतचे पदार्थ खायला खूप आवडतात. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. सतत एका जागेवर बसून राहणे, व्यायाम न करणे, सतत घरी बसून राहणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीर सक्रिय असणे गरजेचे आहे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या
सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये जमा झालेली चरबी वाढल्यानंतर लिव्हरला सूज येते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.
हे देखील वाचा: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी नियमित करा फेस योगा, फायदे ऐकून व्हाल थक्क
यकृताचे आरोग्य बिघडण्यामागे दारू पिणे हे मुख्य कारण आहे. सतत दारू प्यायल्यामुळे लिव्हरला सूज येते आणि लिव्हरसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने यकृताचा कर्करोग होण्याची भीती असते. तसेच आहारात कमीत कमी साखरेचा समावेश करावा. जास्त साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.