(फोटो सौजन्य: istock)
घरात उंदीर येण्याची समस्या सामान्य आहे मात्र यावर वेळीच उपाय केल्यास ही समस्या हे मोठे रूप घेऊ शकते. जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात उंदरांची समस्या आहे. एकदा का उंदीर आपल्या घरात घुसले की मग असे ठाण मांडून बसतात की काही केल्या घरातून जाण्याचं नाव घेत नाहीत. कालांतराने त्यांना बाहेर न काढल्यास ते वाढू लागतात, ज्यामुळे घराच्या प्रत्येक भागात त्यांची दहशत दिसून येते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, घरात राहणारे उंदीर हे आजारांचा धोका वाढवत असतात. आपल्या नकळत ते कधी अन्नपदार्थांना शिवून जातात आपल्याला काळातही नाही. मग हेच अन्नपदार्थ खाऊन आपण आजारांना खुले आमंत्रण देतो.
एवढेच काय तर बऱ्याचदा हे उंदीर आपल्या घरातील महागड्या वस्तू आणि कपडे फाडून आपले आर्थिक नुकसानही करतात अशात त्यांच्यावर योग्य तो उपाय करणे फार महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही बाजारातील रासायनिक घटकच नाही तर स्वयंपाक घरातील काही पदार्थांची मदत घेऊ शकता. होय, अनेकांना हे ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाक घरात आढळणारे अनेक घटक उंदरांना पळवून लावण्यास प्रभावी ठरतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ परिणाम
पुदिन्याची पान
पुदिन्याचा वापर हा फक्त चटणीपुरता मर्यादित नसून तुम्ही यापासून घरातील उंदरांनाही पळवून लावू शकता. उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही, अशात याचा वापर करून तुम्ही त्यांना घरातून पळवून लावू शकता. यासाठी घरातील ज्या भागात उंदीर दिसतात त्याठिकाणी पुदिन्याची पान ठेवा किंवा पुदिन्याचा रस स्प्रे करा. याच्या वासाने आपोआप उंदीर घराबाहेर पडू लागतील.
कांदा-लसूण स्प्रे
कांदा-लसूण स्प्रे देखील उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी एक प्रभावी उपाय ठरेल. यासाठी कांदा आणि लसणाचा रस काढून एकत्र एका स्प्रे बाटलीत भरा. बाटली हलवा जेणेकरून हे रस चांगले एकत्रित होतील. आता हा स्प्रे जिथे जिथे उंदरांचा वावर आहे तिथे शिंपडा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात याचा शिडकाव करा आणि मजा बघा.
प्री-डायबिटीज काय आहे? वेगाने वाढत आहे हा आजार; वेळीच याचे संकेत जाणून घ्या आणि स्वतःचे संरक्षण करा
कापूर
पूजेसाठी वापरला जाणारा कापूर उंदरांना पळवून लावण्यासाठीही उपयुक्त ठरेल. कापराचा तीव्र सुवास उंदरांना सहन होत आणि ज्यामुळे ते भराभरा यापासून दूर पळू लागतात. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरच्या गोळ्या ठेवा. तुम्ही कापराची पावडर देखील वापरू शकता. यामुळे उंदीर घरातून पळून जाण्यास मदत होईल आणि तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत. स्वस्तात प्रभावी ठरणारे हे घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा.