उपवास करून या पद्धतीने करा वजन कमी
देशभरात 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्री उत्सवास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साह निर्माण होतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्या देवीला अर्पण केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवास केल्यानंतर पायात चप्पल न घालता अनवाणी पायांनी सगळीकडे प्रवास करावा लागतो. तसेच या दिवसांमध्ये उपवासाचे पदार्थ खावे लागतात. धार्मिक दृष्ट्या केलेल्या उपवास आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे सतत बाहेरचे पदार्थ किंवा तेलकट तिखट पदार्थ खाऊन वाढलेले वजन कमी करण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करणे अतिशय योग्य आहे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण तरीसुद्धा वजन लवकर वाढत नाही. जीम करणे, व्यायाम करणे, आहार तज्ज्ञांकडून घेतलेला डाईट फॉलो करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वजन कमी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नवरात्री उत्सवात उपवास करून वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होऊन शरीर स्लिम दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रोजच्या आहारात करा जिऱ्याचे सेवन, चवीसोबत आरोग्यालासुद्धा होतील जबरदस्त फायदे
नवरात्रीच्या उपवासामध्ये कडधान्य खाल्ले जात नाही. अशावेळी तुम्ही भाज्या आणि फळांचे सेवन करू शकता. भाज्यांमध्ये असलेले गुणधर्म शरीराला पोषण देतात. त्यामुळे आहारात तुम्ही सॅलेड किंवा सूप बनवून पिऊ शकता. वजन वाढवण्याची भाज्या प्रभावी ठरतात. भाज्यांमध्ये असलेले पौष्टिक घटक शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात.
उपवास केल्यानंतर अनेक लोक फक्त दिवसभर फळे खाऊन राहतात. पण उपवासाच्या दिवसांमध्ये जास्त फळे खाऊ नयेत. उपवासाच्या दिवसांमध्ये सतत फळे खाण्याऐवजी पचनास हलके आणि शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. जास्त प्रमाणात फळे खाल्ल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: ‘या’लोकांनी चुकूनही करू नका शेंगदाण्याचे सेवन, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
उपवासाच्या दिवशी खूप कमी पाणी प्यायले जाते. पण असे न करता शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यावे. पाण्यासोबतच नारळ पाणी, लिंबू पाणी, सरबत किंवा इतर कोणताही ज्युस प्यावा. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये पाणी पिणे आवश्यक आहे.