घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा आवळा चूर्ण
पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून पितात. आवळा खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नियमित आवळा खाल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. कच्च्या आवळ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. मुरांबा, आवळ्याचं लोणचं, आवळा सुपारी, आवळा कॅण्डी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आयुर्वेदामध्ये सुद्धा आवळा पावडर खाण्यास विशेष महत्व आहे. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आवळा पावडर किंवा आवळा चूर्णाचे सेवन केले जाते. बाजारात आवळा चूर्ण सहज उपलब्ध होते. केस आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याचे सेवन केले जातात. चवीला तुरट असलेले आवळा अनेक आजारांवर गुणकारी आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हिवाळ्यात दुपारच्या जेवणासाठी बनवा पौष्टिक चवीचा मेथी पुलाव, वाचा सोपी रेसिपी
आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण बाजारात मिळणारी आवळा पावडर विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेली आवळा पावडर आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. आवळा पावडर किंवा चूर्ण घरी सहज बनवता येते. चला तर जाणून घेऊया आवळा पावडर बनवण्याची सोपी रेसिपी.
१० आवळे
आवळा पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून सुकवून घ्या. आवळे पूर्ण सुकल्यानंतर त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक चुरा करून घ्या. यामध्ये पाणी घालू नये. तयार केलेली आवळ्याचा चुरा कॉटनच्या कपड्यात घेऊन त्यातील पाणी संपूर्ण नितळून घ्या. आवळ्यामध्ये जराही पाणी ठेवू नये.
आवळ्यातील पाणी काढून झाल्यानंतर ताटात आवळ्याची पावडर ठेवून उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवा. आवळ्याची पावडर व्यवस्थित सुकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा एकदा फिरवून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आवळा पावडर.
हे देखील वाचा: हिवाळ्यात रोजच्या आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थाचे सेवन, त्वचा आणि आरोग्याला होतील अनेक फायदे
आवळा चूर्ण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आवळा पावडर घेऊन त्यात गुळाचा पाक, मीठ, काळं मीठ, सुंठ आणि जिरे पावडर टाकून व्यवस्थित बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी पिऊ शकता. या पावडरचे सेवन केल्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतील.