दुपारच्या जेवणासाठी बनवा पौष्टिक चवीचा मेथी पुलाव
हिवाळ्यामध्ये थंड जेवण जेवण्याऐवजी गरमा गरम जेवण्याचा आनंद घ्यावा. कारण वातावरणात गारवा असल्यामुळे शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. त्यामुळे आहारात पराठे, सूप, घरी बनवलेल्या गोड पदार्थांचे सेवन करावे. भारतीय स्वयंपाक घरात नेहमीच पौष्टिक आणि आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ बनवले जातात. पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मेथी पुलाव कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. शिवाय हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अनेकदा घरात तुम्ही मटार पुलाव किंवा सोयाबीन पुलाव खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कधी दही कबाब खाल्ले आहेत का? अवघ्या 15 मिनिटांत तयार होते रेसिपी
पालेभाज्यांमध्ये मेथी खाणे आरोग्यासाठी पौष्टिक आहे. लहान मुलं पालेभाज्यांचे सेवन करण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना पालेभाज्यांपासून भात किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चवीला कडू असलेली मेथी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी भाजी वरदान आहे. मेथीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. चला तर जाणून घेऊया मेथी पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मटार पुरी, वाचा साहित्य आणि रेसिपी