पावसाळा स्पेशल रेसिपी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड वडा, नोट करून घ्या रेसिपी
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर प्रत्येकाला नवीन पदार्थ हवा असतो. बऱ्याचदा नाश्त्यात विकतचे तेलकट पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण वारंवार विकतच्या पदार्थांचे सेवन करू नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट ब्रेड वडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा ब्रेड वडा घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. अचानक पाहुणे घरी आल्यानंतर त्यांना नाश्त्यात कोणता पदार्थ बनवून द्यावा, बऱ्याचदा लवकर सुचत नाही. अशावेळी ब्रेडपासून बनवलेला वडा अतिशय उत्तम आहे. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेले पदार्थ चवीला कायमच टेस्टी लागतात. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. लहान मुलं कायमच भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने विविध पदार्थ बनवून देऊन तुम्ही पौष्टिक आहार देऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड वडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत मसाला कॉर्न चीज कटलेट, नोट करून घ्या सोपी रेसिपी






