ENG vs IND : इंग्लंडने 3-0 ने जिंकली T-20 सीरीज; टीम इंडियाचा मोठा पराभव
ब्रिस्टल : फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने काउंटी ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना ९ गडी राखून जिंकला. या विजयासह, यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आता नव्या मालिकेची कामगिरी समोर आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने १५९ धावांचे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले, म्हणजेच संघाने ३६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. एकूणच, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताला केवळ दोनदाच अधिक चेंडू शिल्लक असताना पराभव पत्करावा लागला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भारतीय संघाने १५८ धावा केल्या. निर्धारित षटकांमध्ये ७ गडी बाद. भारतीय संघाने ४८ धावांवर तीन गडी गमावले होते. येथून कर्णधार श्रेयस अय्यरने सूत्रे हाती घेतली. त्याने आणि शिवम दुबेने ४३ चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. दुबे २३ चेंडूंमध्ये २२ धावा करून बाद झाला. अय्यर ४९ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि चार चौकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला.
ब्रिस्टलच्या खेळपट्टीचा अंदाज
ब्रिस्टल येथील सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, ज्यामुळे मोठे शॉट्स मारणे सोपे जाते. या मैदानावर चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतो. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरु शकते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग आणि बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. सामना जसजसा पुढे जाईल, तसतसे फलंदाजांचे वर्चस्व राहील. त्यामुळे, एक मोठा धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो.
पाऊस नसल्याने सामना झाला पूर्ण
ब्रिस्टलमध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे कालच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी होती. त्यानुसार, वातावरण राहिल्याचे दिसून आले.






