सकाळच्या नाश्त्यात काकडीपासून बनवा चविष्ट भाकरी!
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यामध्ये नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. नेहमीच काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात काकडीची भाकरी बनवून खाऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी आणि काकडीपासून बनवलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच काहींना काही रेसिपी शेअर करत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली काकडीची भाकरी चवीला अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा, घरातील सगळेच करतील गोड कौतुक
वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्ता करा हेल्दी टेस्टी कोथिंबीरीचे सूप,आंबट तिखट सगळ्यांचं आवडेल