घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात करा स्वागत! झटपट बनवा चविष्ट गुलकंद फिरनी, नोट करा रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर अतिशय आवडीने शेवयाची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम किंवा रसगुल्ले विकत आणले जातात. पण नेहमीच तेच ठराविक गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट गुलकंद फिरनी बनवू शकता. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांचे राजेशाही थाटात स्वागत करायचे असल्यास हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. तांदूळ आणि गुलकंदाचा वापर करून बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. गुलकंद केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम किंवा इतर थंड पदार्थ खाल्लेले जातात. पण त्याऐवजी चमचाभर दुधात गुलकंद मिक्स करून खावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. चला तर जाणून घेऊया गुलकंद फिरनी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






