Valentine Day निमित्त पार्टनरसाठी बनवा चविष्ट 'हार्ट शेप पिझ्झा'
7 फेब्रुवारीपासून सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या दिवसांमध्ये अनेक जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवतात, तर जोडपी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र अनेकांना घरी राहून पार्टनरसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करायला आवडतो. या दिवशी अनेक पार्टनर आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहींना काही खास पदार्थ बनवतात. घरी बनवलेल्या चविष्ट पदार्थांचा गप्पा मारत आनंद घेतला जातो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाइन डे आणखीन स्पेशल साजरा होण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये हार्ट शेप पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला हार्ट शेप पिझ्झा तुमच्या पार्टनरला नक्कीच आवडेल. हा पिझ्झा बनवण्यासाठी जास्त वेळ आणि साहित्य लागत नाही. त्यामुळे तुम्ही झटपट हार्ट शेप पिझ्झा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हार्ट शेप पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Valentines Day 2025: 14 फेब्रुवारीचा दिवस बनवा खास, बिस्किटांपासून घरीच तयार करा ‘चॉको लाव्हा केक’