पारंपरिक मसाले भात
श्रावण महिना सुरु झाल्यानंतर अनेकांच्या घरी मासे, चिकन, अंडी इत्यादी पदार्थ बनवले जात नाहीत. अशावेळी घरात फक्त भाज्या, पालेभाज्या आणि शाहाकारी जेवण बनवले जाते. रोज रोज काय भाजी बनवावी? डाळ कोणती बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. रोज रोज डाळ किंवा तिखट वरण खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सर्वच घरांमध्ये दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात बनवला जातो. भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. पण सतत तोच पांढरा भात खाऊन कंटाळा आला असेल तर एक वाटी तांदळाचा वापर करून मसाले भात नक्की बनवून पाहा. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी अजूनही मसाला भात बनवण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली पद्धत अजूनही जपली जात आहे. चला तर पाहुयात मसाले भात बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: १० मिनिटांमध्ये बनवा जाळीदार खमंग ढोकळा, मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ