पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांपासून बनवा लसूण मसाला चिवडा
वर्षाच्या बाराही महिने भारतीय घरात सकाळच्या नाश्त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चिवडा. वेगवेगळ्या पदार्थांपासून चिवडा बनवला जातो. पारंपरिक चवीचा चिवडा लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. पांढऱ्या शुभ्र मुरमुऱ्यांचा चिवडा कमीत कमी साहित्यात बनवता येतो.सकाळच्या नाश्त्यात कायमच चहा बिस्कीट किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्याऐवजी मुरमुऱ्यांपासून बनवलेला लसूण मसाला चिवडा खावा. लसूण टाकून बनवलेला चिवडा महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो. चिवडा लवकर खराब होत नाही. याशिवाय मुरुमऱ्यांचा चिवडा नरम होऊ म्हणून हवाबंद डब्यात भरून ठेवावा. यामुळे चिवडा जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया मुरमुऱ्यांचा चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






