दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! ऑफिसला नेण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेल्दी सॅलड
दैनंदिन आहारात अनेक लोक आवडीने सॅलड खातात. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर इत्यादी पौष्टिक भाज्यांपासून सॅलड बनवले जाते. याशिवाय वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर आणि फळांचा वापर करून बनवलेले सॅलड खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रियन्ट्स आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित सॅलड खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. पण कायमच तेच ठराविक सॅलड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्या आणि फळांचे सॅलड बनवू शकता. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कायमच बाहेरील तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक सॅलड बनवून खावे. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळेल. चला तर जाणून घेऊया सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साखर माव्याचा अजिबात वापर न करता झटपट बनवा हेल्दी टेस्टी खजूर बर्फी, नोट करून घ्या रेसिपी






