Iran News : 'खामेनी सरकारचा अंत लवकरच...' ; माजी राजकुमार रेझा पहलवींचे खळबळजनक दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल
रेझा पहलवी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, इराणची जनताच देशात सत्ता बदल घडवून आणेल. सध्या राजवट कमकुवत आणि हुकूमशाही आहे. खामेनी सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलेले नाही. देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष समर्थक लोक हवे आहेत. यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायांना इराणच्या जनतेचा पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, इराणमध्ये सत्ता परिवर्तनाशीट बाह्य हस्तक्षेपाची गरज भासणार नाही, सरकार आधीच कोसळलत चालले आहे. केवळ येथील जनतेला मजबूत पाठिंबा हवा आहे.
रेझा पहलवी यांनी सांगितले की, आता वेळ आहे इराणमध्ये इस्लामिक राजवटीच्या अंताची हीच संधी आहे. वाढत जनभोक्ष, आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय दबाव आणि राजवटीची घसरणारी विश्वासार्हता या गोष्टी याचा अंत करण्यासाठी पुरुसे असल्याचे पहलवी यांनी म्हटले आहे.
इराणमध्ये २७ डिसेंबर २०२५ पासून सरकारविरोधी निदर्शने सुरु आहेत. देशातील वाढती महागाई आणि इराणचे चलन रियाची घसरणीमुळे जनता संतप्त झाली आहे. देशात ठिकठिकाणी निदर्शने सुरु आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती बिकट होत चालली आहे.२०२२-२३ नंतरचे हे इराणमधील सर्वात मोठे आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे. सरकारी यंत्रणेच्या या कारवाईत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांचे फुटेजही व्हायरल होत आहे.
याच वेळी दुसरीकडून अमेरिकेच्या इराणवर व्हेनेझुएलासारख्या ऑपरेशनचीही भीती निर्माण झाली आहे. कारण ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, आंदोलनात इराणच्या जनतेवर हिंसाचार झाल्यास अमेरिका गप्प बसणार नाही.
Iran Protest : इराणमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सुरक्षा दलाच्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू






