मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पिंक सॉस पास्ता
पास्ता हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला आवडतो. व्हाईट सॉस पास्ता, मसाला पास्ता, चीज पास्ता इत्यादी अनेक प्रकारचे पास्ता बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला पिंक सॉस पास्ता बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पिंक सॉस पास्ता चवीला अतिशय सुंदर लागतो. घाईगडबडीच्या वेळी झटपट तुम्ही पिंक सॉस पास्ता बनवू शकता. लहान मुलांच्या डब्यात, मोठ्यांच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही हा पास्ता बनवून नेऊ शकता. कामावरून घरी गेल्यानंतर सगळ्यांचं छोटी मोठी भूक लागते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. बाहेरील पदार्थांमध्ये कमी दर्जाच्या वस्तू वापरल्या जातात, ज्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे घरी बनवलेल्या पदार्थांचे जास्त सेवन करावे. संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये पिंक सॉस पास्ता नक्की बनवा. चला तर जाणून घेऊया पिंक सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नाश्त्यासाठी चवदार पदार्थ हवा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा क्रिस्पी ब्रेड कबाब, वाचा सोपी रेसिपी